महाराष्ट्र

Tiger Attacks: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघांच्या हल्ल्यात आणखी दोघांचा मृत्यू; Chandrapur मधील मे महिन्यातील मृतांची संख्या 11 वर

Prashant Joshi

दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, वन विभागाने पीडितांच्या कुटुंबियांना तात्काळ 25,000 रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. या हल्ल्यांमुळे मे महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या हल्ल्यांमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे.

Monsoon Forecast 2025: जून महिन्यात 108% पाऊस, खरीप पिके आणि कृषी क्षेत्रास दिलासा; हवामान अंदाज वर्तवताना IMD चे भाकीत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मान्सून यंदा दमदार बरसण्याच्या तयारीत आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा जून 2025 मध्ये मान्सून पाऊस सरासरी 108% बरसेल असे भाकीत केले आहे. ज्याचा महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि ओडिशा सारख्या प्रमुख राज्यांना याचा फायदा होईल, ज्यामुळे खरीप पिकांच्या पेरणी आणि पाणीसाठ्याच्या पातळीला मदत होईल.

स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘अनादि मी.. अनंत मी…’ या गीतास पहिला ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार' प्राप्त; अमित शहा यांच्या हस्ते झाले वितरण

टीम लेटेस्टली

यावेळी केंद्रीय गृहमंत्री शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी, 2 लाख रुपयांचा धनादेश स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

Marathi in Govt Offices: राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या इ. आस्थापनांमध्ये मराठी अनिवार्य; सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Prashant Joshi

सूचनेनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्ह्यातील केंद्र शासनाची सर्व कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे व अन्य कार्यालये यांमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा वापर करण्यात येतो किंवा कसे, याबाबत पडताळणी करावी.

Advertisement

Aditya Roy Kapur च्या वांद्रे येथील घरी महिला फॅन चा घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांत तक्रार दाखल

Dipali Nevarekar

काही दिवसांपूर्वी वांद्रे भागातच सलमान खानच्या घरातही एका महिलेने घुसण्याचा प्रयत्न केला होता तर सैफ अली खानच्या घरात घुसून एका व्यक्तीने त्याच्यावर वार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Maharashtra EV Policy 2025: महाराष्ट्राचे नवीन ईव्ही धोरण जाहीर; इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी, खरेदीवर मोठी सबसिडी, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

सर्व चारचाकी इलेक्ट्रिक प्रवासी वाहने आणि बसेसना मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर पूर्ण टोलमुक्ती मिळेल. इतर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर 50% टोल सवलत मिळेल. याशिवाय, सर्व इलेक्ट्रिक वाहनांना रस्ता कर आणि नोंदणी शुल्कातून पूर्ण सूट देण्यात येईल.

Mumbai Airport Bomb Threat: मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी; पोलिसांकडून 35 वर्षीय व्यक्तीस अटक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बची धमकी देणाऱ्या एका 35 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली. सुरक्षा प्रोटोकॉल कार्यान्वित झाल्याची खात्री करून अधिकाऱ्यांनी जलद कारवाई केली.

मुसळधार पावसाचा नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या सेवेला फटका, धुकं, दरड कोसळण्याच्या धास्तीने सेवा रद्द

Dipali Nevarekar

आयएमडी ने घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर आता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून टॉय ट्रेनची सेवा बंद केली जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

Advertisement

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 31 मे पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज

Prashant Joshi

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 40-50 किमी वेगाने वारे आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Vikhroli Suicide Case: विक्रोळीच्या कन्नमवार नगर भागामध्ये 25 वर्षीय तरूणीने 22 व्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन; शरीराचे झाले दोन तुकडे

टीम लेटेस्टली

पोलिसांच्या माहितीनुसार हर्षदा मानसिक तणावाखाली होती. तिचा मृतदेह इमारती खाली असलेल्या एका दुचाकी वर आदळला आणि त्यामधून तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले असं सांगण्यात आले आहे.

Mumbai Rash Driving Cases: मुंबईत 2024 मध्ये बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल 10,000 हून अधिक गुन्हे दाखल; वाहनचालकांना 526 कोटी रुपयांचा दंड

Prashant Joshi

गेल्या दोन वर्षांत अवलंबलेल्या पद्धतशीर धोरणानुसार कायदेशीर कारवाईत वाढ झाली आहे, जिथे आता बेदरकारपणे गाडी चालवण्याचे गुन्हे गंभीर गुन्हेगारी कृत्य म्हणून मानले जातात, ज्यात न्यायालयात हजेरी लावावी लागते.

Vaishnavi Hagawane Death Case: 'साधे लग्न, सुनेचा छळ झाल्यास कुटुंबावर बहिष्कार'; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय

Prashant Joshi

संपूर्ण मराठा समाजाने एक उत्तम सामाजिक उपक्रम सुरू केला असून, लग्नांमध्ये होणारा अनावश्यक खर्च थांबवण्यासाठी त्यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे, जेणेकरून इतर कोणत्याही वैष्णवीला हुंड्यामुळे आत्महत्या करावी लागू नये.

Advertisement

पावसामुळे रस्ता गेला चिखलात, तरूणाने दुचाकी थेट खांद्यावर घेत गाठला मार्ग ; सातारामधील व्हिडीओ वायरल (Watch Video)

Dipali Nevarekar

विनय घोरपडे असं या तरूणाचं नाव असून व्हिडीओ मध्ये तो 120 किलो वजनाची मोटारसायकल खांद्यावर घेऊन पावसामुळे खराब झालेल्या शेतातून सुमारे अर्धा किलोमीटर चालत गेल्याचं दिसत आहे.

Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे. त्याशिवाय, लॉटरी अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून देते.

MHT CET 2025 PCM, PCB निकालाची उत्सुकता; पहा Percentile च्या फॉर्म्युला काय? कसा लावला जातो निकाल

Dipali Nevarekar

MHT CET चे निकाल तयार करण्यासाठी अधिकारी Normalisation Process चा वापर करतात. MHT CET उमेदवारांचे टक्केवारी गुण पाच दशांश स्थानांपर्यंत मोजले जातात.

Dhule-Solapur Highway Accident: SUV डिव्हायडरला धडकल्यानंतर खाली उतरलेल्या सहा तरूणांना भरधाव वेगात आलेल्या ट्रकने उडवलं; धुळे-सोलापूर नॅशनल हायवे वर विचित्र अपघात

Dipali Nevarekar

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Dhule-Solapur Highway) गेवराईजवळील गढी पुलावर हा अपघात रात्री 11 च्या सुमारास झाला आहे.

Advertisement

Ramabai Ambedkar Punyatithi 2025: रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील सह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आदरांजली अर्पण

Dipali Nevarekar

रमाबाई आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या. रमाईंनी आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलत बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.

University of Mumbai First Merit List: पदवी प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाची पहिली यादी आज होणार mu.ac.in वर जाहीर

Dipali Nevarekar

तुमचं नाव पहिल्या यादी मध्ये असेल आणि तुम्हांला तो प्रवेश निश्चित करायचा असेल तर तुम्हांला पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यामध्ये पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना वैयक्तिक महाविद्यालयांनी नमूद केलेल्या वेळेत कागदपत्रांची पडताळणी आणि शुल्क भरावे लागेल.

Mumbai Rains-Weather Forecast for May 27: मुंबई, ठाणे शहराला आज 'यलो अलर्ट' पहा हवामान विभागाचा अंदाज

Dipali Nevarekar

काल मुसळधार कोसळलेल्या पावसाने आज थोडी उसंत घेतल्याचं चित्र आहे.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो लक्ष द्या! पाईपलाईन कामासाठी दक्षिण आणि मध्य शहरात 28-29 मे रोजी BMC कडून 24 तासांची पाणी कपात, जाणून घ्या प्रभावित परिसर

Prashant Joshi

बाधित भागातील रहिवाशांना विनंती आहे की, त्यांनी नियोजित पाणी कपातीपूर्वी त्यांच्या गरजांसाठी पुरेसे पाणी आगाऊ साठवून ठेवावे. बंद कालावधीत, पाण्याचा वापर काटकसरीने करावा. पाईपलाईनच्या कामानंतर, बाधित भागात पुढील दोन दिवस कमी दाबाने आणि गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement