Fake Whatsapp Ad: फेक व्हॉट्सॲप जाहिराती, Cyber Fraud यांबाबत तक्रार कोठे कराल? अकोला पोलिसांनी दिली माहिती; घ्या जाणून
अकोला पोलिसांनी याबाबत जनजागृती सुरु केली आहे.
Akola Police Cyber Awareness: आजकालच्या जमान्यात तुम्ही कितीही हुशार असा, पण तुम्ही जर तंत्रज्ञानाचे जाणकार नसाल, तुमच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सुरक्षीततेबाबत तुम्हास अद्ययावत ज्ञान नसेल तर तुम्ही फसवले जाण्याची शक्यता अधिक आहे. नागरिकांच्या तंत्रज्ञान आणि इलॉक्ट्रॉनिक उपकरणांबाबत नसलेली सजगता यातूनच सायबर क्राईम (Cyber Crime) हा प्रकार उदयास आला आणि आता तो मोठा सामाजिक प्रश्न म्हणून पुढे आला आहे. नागरिकांना सातत्याने सायबर फसवणूक, फसव्या व्हॉट्सॲप जाहिराती (Fake Whatsapp Ad), फेक कॉल आणि तत्सम बाबींचा अधार घेऊन होणाऱ्या घोटाळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. म्हणूनच अकोला पोलिसांनी सायबर गुन्ह्यांबाबत जनगृती हाती घेतील आहे. नागरिकांनी सायबर फसवणूक टाळण्यासाठी, अशा गुन्हेगारांपासून दूर राहण्यासाठी काय करावे आणि काय करु नये याबाबत माहिती दिली आहे. तसेच, आवश्यक काळात मदत घेण्यासाठी हेल्पलाईन आणि संकेतस्थळाबाबत माहिती दिली आहे. ही माहिती खालील प्रमाणे:
सायबर गुन्हेगार लोकांना कसे फसवतात?
फसवे लोक व्हॉट्सॲपवर खोट्या जाहिराती, मोठ्या सवलती किंवा नोकरीच्या खोट्या संधींच्या लिंक पाठवतात. या लिंकवर क्लिक केल्यास तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती चोरी होऊ शकते. नागरिकांच्या मनात असलेली पैशांबाबतची लालसा आणि स्वार्थ याला साद घालत सायबर गुन्हेगार लोकांना आपली शिकार बनवतात. (हेही वाचा, WhatsApp Cyber Fraud: व्हॉट्सॲपवर मालकाचा फोटो डीपी, कंपनीच्या अकाउंटंटला गंडा; कंपनीस 85 लाख रुपयांचे नुकसान)
सायबर फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
- फेक Whatsapp जाहिरात स्कॅम पासून सावध रहा!
- ओळखीच्या नसलेल्या व्यक्तींकडून आलेल्या संदेशांवर विश्वास ठेऊ
नका.
- जास्त मोठ्या सवलती किंवा मोफत भेटवस्तू बहुतेक वेळा बनावट असतात. त्यांवर विश्वास ठेऊ नका. आगोदर पूर्ण माहिती घ्या, संदेशांची पडताळणी करा. त्यांच्या मूळ आणि अधिकृत स्त्रोतांबाबत जाणून घ्या.
- वैयक्तिक आणि आर्थिक माहिती अनोळखी व्यक्तींना खासगी, वेबसाइट किंवा सोशल मीडया आदी माध्यमांवर शेअर करू नका.
- व्हॉट्सॲपवर टू-स्टेप व्हेरिफिकेशन (2FA) सुरू करून तुमचे खाते सुरक्षित करा.
फेक लिंक पाठवणारे क्रमांक लगेच ब्लॉक करा आणि रिपोर्ट करा. (हेही वाचा, Cyber Fraud Cases In Pune: पुण्यात एकाच दिवसात सायबर फसवणुकीच्या 10 वेगवेगळ्या घटनांची नोंद; पीडितांना लावला करोडो रुपयांचा चूना)
सायबर गुन्हेगार नेमके काय करतात?
सायबर गुन्हेगार फसवणूक करताना व्यक्तीची पार्श्वभूमी तपासत नाहीत. त्यांना केवळ पैशांमध्ये रस असतो. त्यामुळे ते ज्याव्यक्तीकडे पैसे आहेत अशा कोणत्याही व्यक्तीस टार्गेट करतात. त्यासाठी ते त्यांना फोन, मेसेज, व्हॉट्सॲप ॲण्ड किंवा तत्सम प्रकारच्या कोणत्याही सोशल मीडिया मंचावरुन संपर्क साधतो. समोरुन प्रतिसाद आला की, लगेच हे गुन्हेगार पीडित व्यक्तीच्या दुबळ्या मनस्थितीचा आधार घेऊन त्यांच्यावर आपले गारुड टाकतात. त्यांना डिजिटल अटक करतात किंवा त्यांना त्यांची खासगी माहिती विचारतात. ज्यामध्ये बँक खात्याचे नंबर, पासवर्ड किंवा जवळच्या व्यक्तीबाबतचा तपशील विचारुन घेतात. त्याचाच वापर करुन ते लोकांना फसवतात.
अकोला पोलिसांकडून जनजागृती
फसवणूक झाल्यास किंवा त्याबाबत मदत कशी मिळवाल?
Cyber Fraud Helpline: शक्यतो सायबर फसवणूक होणारच नाही, याची पूरेपूर काळजी घ्या. त्यासोठी आपण वापरत असलेली सर्व प्रकारची सॉफ्टवेअर अगदी अद्ययावत ठेवा. सोशल मीडिया बँक खाती आणि तत्सम खात्यांचे पासवर्ड अतिशय गुंतागुंतीचे ठेवा. ज्यामध्ये अक्षरांसह अंक आणि सांकेतीक चिन्हांचा वापर करा. तरीही फसवणूक झाली किंवा अशा काही प्रकाराबाबत आपणास मदत मिळवायची असेल, माहिती द्यायची असेल किंवा तक्रार द्यायची असेल तर www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. आर्थिक फसवणूक झाल्यास 1930 वर कॉल करा. ज्यामुळे तुम्हाला तातडीने मदत मिळेल आणि तुमच्यावर गुदरलेल्या प्रसंगाचे निवारण होण्यास अधिकृत संस्था, पोलीस आणि यंत्रणेकडून मदत मिळेल.