What is Mpox? एमपॉक्स म्हणजे काय? लक्षणे, सद्यस्थिती आणि प्रतिबंधात्मक उपाय घ्या जाणून
हा एक विषाणूजन्य आजार आहे. जो जगामध्ये सर्वप्रथम सन- 1958 मध्ये माकडांमध्ये आढळला होता. माकडांमध्ये आढळलेला हा आजार पुढे मानवांमध्ये पसरला. प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत (Africa CDC) आढळून यायला लागला.
जो दोन वर्षांपूर्वीच म्हणजे 2022 मध्ये तो लैंगिक संक्रमित व्हायरस (Sexually Transmitted Virus) म्हणून ओळखला गेला. ज्याचा 70 पेक्षा जास्त देशांमध्ये उद्रेक आढळून आला. Mpox हा विषाणूंच्या स्मॉलपॉक्स सारख्याच कुटुंबातील आहे. या आजारामध्ये सामान्यतः ताप, थंडी वाजून येणे आणि शरीरदुखी यांसारखी सौम्य लक्षणे दिसून येतात. गंभीर प्रकरणांमध्ये, यामुळे चेहरा, हात, छाती आणि गुप्तांगांवरील त्वचेला काप पाहायला मिळू शकतात.
Mpox आजाराची लक्षणे काय?
एमपॉक्सची लक्षणे सामान्यत: 7-14 दिवसांनी दिसतात. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, सुजलेल्या लिम्फ नोड्स (Lymph Nodes), डोकेदुखी (Headaches), स्नायू दुखणे (Muscle Aches), थकवा आणि पाठदुखी (Back Pain) यांचा समावेश होतो. सर्वसाधारणपणे चेहऱ्यावर पुरळ पाहायला मिळतात आणि पुढे ते शरीराच्या इतर भागावर पसरतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने अहवाल दिला आहे की, या आजाराची समस्य वाढल्यास शरीरामध्ये गंभीर गुंतागुंत निर्माण होते. ज्यामध्ये न्यूमोनिया, उलट्या, गिळण्यात अडचण, डोळ्यांचे संक्रमण आणि मेंदू, हृदय आणि गुदाशय जळजळ अशा लक्षणांचाही समावेश असू शकतो. एचआयव्ही किंवा कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या लोकांना या आजाराचा धोका अधिक असतो. (हेही वाचा, Monkeypox: मंकीपॉक्स आजाराचं नाव बदललं, जागतिक आरोग्य संघटनेकडून नव्या नावाची घोषणा)
Mpox ची सद्यस्थिती
जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पुर्वीच्या मंकीपॉक्स म्हणजेच आजच्या Mpox रुग्णांची सर्वाधिक संख्या ही काँगोचे डेमोक्रॅटिक रिपब्लिक (DRC) मध्ये पाहायला मिळते. ज्यामुळे संपूर्ण आफ्रिकेमध्ये Mpox प्रकरणे वाढली आहेत. या वर्षी DRC मध्ये जवळपास 27,000 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. परिणामी आतापर्यंत सुमारे 1,100 मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. एकूण मृतांमध्ये मुलांचीह संख्या मोठी आहे. आरोग्य क्षेत्रातले अभ्यासक सांगतात की, काँगोमध्ये आढळणारा नवीन प्रकार अधिक प्राणघातक आहे आणि वेगाने पसरतो. त्याची लक्षणे जरी सौम्य आढळत असली तरी ती शोधणे कठीण असते. बुरुंडी, केनिया, रवांडा आणि युगांडा यांसारख्या शेजारच्या देशांमध्येही हा विषाणू पसरला आहे. (हेही वाचा, Mpox Strain: आफ्रिकेच्या बाहेर स्वीडनमध्ये समोर आली प्राणघातक एमपॉक्स स्ट्रेनची पहिली घटना; WHO ने घोषित केली आहे जागतिक आरोग्य आणीबाणी)
Mpox प्रतिबंध
Mpox टाळण्यासाठी, संक्रमित प्राणी आणि लोकांशी संपर्क टाळणे महत्वाचे आहे. नियमित हात धुणे यासारख्या स्वच्छतेच्या चांगल्या पद्धती महत्त्वाच्या आहेत. उच्च-जोखीम असलेल्या भागात, संरक्षणात्मक कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. Mpox साठी सध्यातरी कोणतेही विशिष्ट अँटीव्हायरल उपचार उपलब्ध नसल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक काळजी घेणे हेच महत्त्वाचे आहे. नाही म्हणायला काही औषधे आणि लस प्रतिबंधात्मक म्हणून वापरले जाते.
आरोग्य आणीबाणीचे परिणाम
आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने mpox च्या वाढत्या प्रसारामुळे आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. या घोषणेचे उद्दीष्ट उद्रेक कमी करण्यासाठी संसाधने आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या आजाराविरोधात लढा एकत्रित करणे आहे. डब्ल्यूएचओ इतर देशांमध्येही आणीबाणी घोषित करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे रोगाशी लढण्यासाठी अधिक संसाधने वाटप करण्यात मदत होऊ शकते.
सन 2022 च्या उद्रेकातील फरक
आफ्रिकेतील सध्याचा mpox उद्रेक 2022 च्या जागतिक उद्रेकापेक्षा वेगळा आहे. ज्याचा प्रामुख्याने समलिंगी आणि उभयलिंगी पुरुषांवर परिणाम झाला. आफ्रिकेत, 70 टक्क्यांहून अधिक प्रकरणे आणि 85 टक्के मृत्यू 15 वर्षाखालील मुलांमध्ये आहेत, विशेषत: DRC मध्ये.