Coronavirus: पूर्णपणे लसीकरण झालेल्या रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी, शासकीय आकडेवारीच्या आधारावर ICMR चा दावा

याच दरम्यान लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. या संबंधित आरोग्य विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी गुरुवारी असे म्हटले की, ज्यांनी कोरोनावरील लसीचा डोस घेतलेला नाही किंवा आंशिक रुपाच लस घेतली त्यांच्या मृत्यूचा धोका अधिक होता.

Coronavirus outbreak (Photo Credits: IANS)

Coronavirus: देशात कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत चढउतार पहायला मिळत आहे. याच दरम्यान लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. या संबंधित आरोग्य विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी गुरुवारी असे म्हटले की, ज्यांनी कोरोनावरील लसीचा डोस घेतलेला नाही किंवा आंशिक रुपाच लस घेतली त्यांच्या मृत्यूचा धोका अधिक होता. अधिकाऱ्यांनी पॉझिटिव्ह कोविड19 रुग्णांसह रुग्णालयात भर्ती झालेल्या मृतांसंबंधित एका शासकीय विश्लेषणाच्या आधारावर हा निष्कर्ष काढला आहे.

ICMR चे नॅशनल क्लिनिकल रजिस्ट्री ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, सर्व लसीकरण झालेले आणि त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी 10 टक्के जणांचा मृत्यू झाला. तर आंशिक रुपात किंवा लसीकरण न झालेल्यांचा आकडा 22 टक्के होता. अधिकाऱ्यांनी गुरुवारी याबद्दल माहिती दिली आहे.(COVID19 मधून बरे झाल्यानंतर काही दिवस कंबर का दुखते? जाणून घ्या तज्ञांचे याबद्दलचे मत)

आयसीएमआरचे महानिर्देशक बलराम भार्गव यांनी असे म्हटले की, लसीकरणाशिवाय (11.2 टक्के) च्या तुलनेत लसीकरण (5.4 टक्के) झालेल्यांमध्ये मॅकेनिकल वेंटिलेशनची आवश्यकता अधिक कमी होती. याच्या विश्लेषणात असे ही म्हटले की, तिसऱ्या लाटेदरम्यान रुग्णालयात भरती होण्याऱ्यांचे वय 44 वर्ष होते. यापूर्वीच्या लाटेत 55 वर्षाच्या तुलनेत पण प्रत्येक लाटेत कोर्मोबिड रुग्णांचा आकडा अधिक होता.(कोरोनाच्या आणखी एक नव्या वेरियंट NeoCov व्हायरसचा धोका, प्रत्येक 3 पैकी 1 संक्रमिताचा होतोय मृत्यू-रिपोर्ट्स)

सरकारने गुरुवारी असे म्हटले की, जवळजवळ 44 वर्ष तरुण वर्गाला कोविड19 च्या या लाटेत तुलनात्मक रुपात अधिक संक्रमण झाले. परंतु त्यांच्या उपचारासाठी औषधांचा वापर फार कमी झाला. साप्ताहित संवाददाता  संम्मेलनाला संबोधित करताना आयसीएमआरचे महानिर्देशक बलराम भार्गव यांनी असे म्हटले की, कोविड19 च्या या लाटेत रुग्णांना घसा खवखवण्याची समस्या अधिक पहायला मिळाली.

सदर निष्कर्ष हा कोविड19 च्या नॅशनल क्लिनिकल रजिस्ट्री येथून काढण्यात आला आहे. ज्यामध्ये 37 वैद्यकिय केंद्रात भर्ती झालेल्या रुग्णांचा डेटा एकत्रित केला होता.  भार्गव यांनी असे म्हटले की, 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबर ते 17 जानेवारी दरम्यान आम्ही अभ्यास केला. त्यानुसार पहिल्या काळात डेल्टा वेरियंटचा अधिक परिणाम दिसून आला होता. तर दुसऱ्या स्लॉटमध्ये ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती.