World Mosquito Day 2024: जागतिक मच्छर दिन, डेंग्यू आजार, त्याची भारतातील स्थिती घ्या जाणून

जागतिक मच्छर दिन (World Mosquito Day 2024) हा दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी जगभर साजरा केला जातो. मच्छरांसाठी विशेष दिवस का साजरा करावा? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण, जगभरात होणाऱ्या आजारांमध्ये डास चावल्याने होणाऱ्या आजारांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. ज्यामध्ये डेंग्यू (Dengue), मलेरिया (Malaria), हिवताप, चिकनगुनिया (Chikungunya) यांसारख्या आजारांचा समावेश आहे.

Mosquito | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

जागतिक मच्छर दिन (World Mosquito Day 2024) हा दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी जगभर साजरा केला जातो. मच्छरांसाठी विशेष दिवस का साजरा करावा? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण, जगभरात होणाऱ्या आजारांमध्ये डास चावल्याने होणाऱ्या आजारांचे (Mosquito-Borne Diseases) प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. ज्यामध्ये डेंग्यू (Dengue), मलेरिया (Malaria), हिवताप, चिकनगुनिया (Chikungunya) यांसारख्या आजारांचा समावेश आहे. त्यामुळे जगभरामध्ये मच्छर, डास यांच्यापासून सुरक्षा, निर्मुलन आणि उपाययोजना यांबाबत जनजागृती व्हावी म्हणून हा विशेष दिन साजरा केला जाऊ लागला. प्रामुख्याने हा दिवस ब्रिटीश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस (Sir Ronald Ross) यांनी1897 मध्ये लावलेल्या शोधाचे स्मरण म्हणून साजरा केला जातो. रॉस यांनी मादी ॲनोफिलीस डासाच्या (Anopheles Mosquito) पोटात मलेरियाचे परजीवी असल्याचे शोधून काढले आणि डास मानवांमध्ये मलेरिया पसरवतात याची पुष्टी केली.

2024 मध्ये डेंग्यूचे रेकॉर्डब्रेक प्रकरणे

वर्ल्ड मॉस्किटो प्रोग्रामच्या आकडेवारीनुसार, 2024 या सुरु असलेल्या वर्षात जगभरातील जवळपास 80 देशांमध्ये 'डेंग्यू' या आजाराचे आतापर्यंत तब्बल 11 दशलक्षाहून रुग्ण नोंदवले गेले. या वर्षात आतापर्यंत जगभरात 24,000 हून अधिक रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची आणि 6,500 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, हा आजार वेगाने पसरत असल्याचेही आकडेवारी सांगते. (हेही वाचा, People In Africa Eating Mosquito Burgers: आफ्रिकेत लोक खातात मॉस्किटो बर्गर, व्हिडीओ पाहून व्हाल चकित)

मच्छरजन्य रोगांचा भारतातील प्रभाव

नॅशनल सेंटर फॉर वेक्टर-बोर्न डिसीजेस कंट्रोल (NCVBDC) च्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया,  लिम्फॅटिक फिलेरियासिस आणि लेशमॅनियासिस यांसारख्या वेक्टर-जनित रोगांमध्ये अलीकडच्या काळात घट झाली आहे. मात्र, डास चावल्याने होणारा डेंग्यू आजार मात्र आव्हान कायम ठेऊन आहे. विशेषत: शहरी भागात. एका आकडेवारीनुसार भारतामध्ये सन 2023 मध्ये या आजाराची 68% प्रकरणे आढळली आहेत. देशात 2023 मध्ये 2.89 लाख डेंग्यू प्रकरणे आणि 485 मृत्यूंची नोंद झाली. तर, 2022 मध्ये 2.33 लाख प्रकरणे आणि 303 मृत्यू झाले. (हेही वाचा, Mosquito Bite: 'डास चावणे हा 'अपघात' नाही, त्याचा Accident Insurance Policy अंतर्गत समावेश होऊ शकत नाही'- Calcutta High Court)

डास नियंत्रण किंवा निर्मुलनासाठी नव्या आणि अभिनव कल्पना राबविण्याची आवश्कता निर्माण झाली आहे. त्यासाठी स्वच्छता, साफसफाई, साजलेल्या पाण्याचा निचरा करणे यांसह नागरिकांमध्ये जाणीवजागृती करण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे डासांची प्रजनन स्थळे उदद्ध्वस्त होतील आणि त्यांनी अंडी घालण्याचे प्रमाण घटले तर आपोआपच डासांचे निर्मुलन होण्यास मदत होईल. NCVBDC नॅशनल वेक्टर बोर्न डिसीजेस कंट्रोल प्रोग्राम (NVBDCP) ची देखरेख करते, ज्यामध्ये मलेरिया, लिम्फॅटिक फायलेरियासिस यांसारख्या आजारांच्या निर्मूलन कार्यक्रमांचा समावेश होतो. मलेरिया आणि लिम्फॅटिक फिलेरियासिस 2030 पर्यंत नष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे डेंग्यू आजाराच्याही निर्मुलनाचे लक्ष्य ठेवणे आवश्यक बनले आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी दिलेल्या एका माहितीनुसार, यंदाच्या वर्षी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात यावर्षी सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे त्यांनी राज्य सरकारने आणि आरोग्य यंत्रणांसर नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now