Dhamma Chakra Pravartan Din 2021 Messages: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मराठी संदेश, Wishes, Images शेअर करुन बौद्ध बांधवांना द्या शुभेच्छा
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मराठी संदेश, Wishes, Images सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन बौद्ध बांधवांना शुभेच्छा देऊ शकता.
Dhamma Chakra Pravartan Din Marathi Messages: अशोक विजयादशमीचं औचित्य साधत 14 ऑक्टोबर 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या काही अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता. नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकरांनी धर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जावू लागला. भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत 'धम्मचक्र प्रवर्तन' केले, अशी बौद्ध धर्मियांची मान्यता आहे. म्हणूनच या दिवसाला 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' म्हणून संबोधले जाते. दरवर्षी या दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोविड-19 निर्बंधांमुळे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत.
मात्र धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मराठी संदेश, Wishes, Images सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन बौद्ध बांधवांना शुभेच्छा देऊ शकता. (धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त Wishes, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून द्या शुभेच्छा)
धम्मचक्र प्रवर्तन दिन शुभेच्छा!
आजही येतो गंध भिमाच्या दिक्षाभूमीच्या मातीला,
या मातीने उद्धारिले साऱ्या मानव जातीला
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बुद्धाच्या चरणावरती
विजया दशमी दिनी
दिक्षा आम्हा दिली भीमाने
मंगल दिन तो जनी
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझाचं गौतमा प्रकाश पडे अंतरी
तुझेचं धम्मचक्र फिरे जगावरी
धम्मचक्र दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
माणसाला माणूसकीची दिशा देणारा
आजचा दिवस
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!
मानवतेचा शिल्पकार या जगामंध्ये ठरला
भिमानी कोटी कोटी काळजात बुद्ध कोरला
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
इसवी सन पूर्व तिसर्या शतकामध्ये सम्राट अशोका यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे हा दिवस 'अशोक विजयादशमी' म्हणून ओळखला जातो. याच दिवसाचं औचित्य साधत विजयादशमीच्या मुहूर्तावर 14 ऑक्टोबर 1956 साली डॉ. आंबेडकरांनी देखील नागपूरच्या दीक्षाभूमीवर सुमारे 5 लाख अनुयायींसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. यामुळेच तेव्हापासून नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली.