अयोध्या  राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) प्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. तर नोव्हेंबरमध्ये या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करण्यास नकार देण्यात आला होता. परंतु आज अयोध्याप्रकरणी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असून सरन्यायाधीश रंजन गोगई (Ranjan Gogoi) यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये सुनावणी करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी जानेवारी पासून सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने 2010 मध्ये 2.77 एकर जमीन तीन पक्षकारांमध्ये, निर्मोही आखाडा आमि राल लल्ला यांच्यामध्ये समान वाटप होईल असा निर्णय देण्यात आला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर 14 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. परंतु 9 मे 2011 मथ्ये या निर्णयाला न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली होती.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर प्रकरण लक्ष वेधून घेत आहे. तर हिंदूत्ववादी संघटनांनकडून बैठका घेत असल्याने केंद्र सरकारवर दबाव वाढत चालला आहे. तसेच अयोध्या राम मंदिर प्रकरणी वेगळा कायदा सर्वोच्च न्यायालयाने तयार करावा अशी मागणी हिंदूत्ववादी संघाकडून केली जात आहे.