Online Fraud: 'उबर कस्टमर केअर नंबर'वरून मागितली मदत; ग्राहकाला थेट पाच लाख रुपयांचा गंडा; ऑनलाईन फसवणूक

प्रदीप चौधरी असे ग्राहकाचे नाव आहे.

fraud | (File image)

Cyber Scam With Uber Passenger: गूगलची मदत घेऊन 'उबर कस्टमर केअर नंबर' (Uber Customer Service) शोधणे आणि त्यावरुन मदत मागणे एका उबर ग्राहकाला चांगलेच महागात पडले आहे. प्रदीप चौधरी असे ग्राहकाचे नाव आहे. या ग्राहकाला गूगलवरुन शोधलेला क्रमांक चुकीचा होता. दुर्दैवाने तो ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा निघाला. ज्यामुळे चौधरी यांना एक-दोन नव्हे तर तब्बल पाच लाख रुपयांपेक्षाही अधिक नुकसान झाले. त्यांनी मदतीसाठी मदत मागितल्यानंतर त्यांच्यासोबत फसवणूक झाले आणि ते ऑनलाईन घोटाळ्याचे बळी ठरले.

चुकीचे कॅब शुल्क:

वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, चौधरी यांनी एसजे एन्क्लेव्हचे रहिवासी असलेली उबर कार बुक केली. त्यांना भाड्यापोठी त्यांनी 205 रुपये आकारले गेले. जे मान्य करुन ते उबेर कॅबद्वारे गुरुग्रामला गेले. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, उबरने त्यांना ट्रिपसाठी 318 रुपये आकारले. विसंगती लक्षात घेऊन, ड्रायव्हरने कस्टमर केअरद्वारे पैसे परत करण्याची सूचना केली. (हेही वाचा, Mumbai Cyber Police: बायकोपुढे शायनिंग मारण्यासाठी मुंबई पोलिसांची पासपोर्ट पडताळणी यंत्रणा हॅक, उचापतखोर नवऱ्यास अटक)

बनावट ग्राहक सेवा क्रमांक:

चौधरी यांनी Google-सूचीबद्ध क्रमांक '6289339056' अॅक्सेस केला, ज्याने त्यांना '6294613240' वर रीडायरेक्ट केले आणि शेवटी '9832459993' वर राकेश मिश्रा नावाच्या व्यक्तीकडे पाठवले. मिश्रा यांनी चौधरी यांना गुगल प्ले स्टोअरवरून 'रस्ट डेस्क अॅप' डाउनलोड करण्याची सूचना केली आणि त्यांना पेटीएमद्वारे रिफंड प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली.

आर्थिक नुकसान:

दुर्दैवाने, मिश्रा नामक व्यक्तीने केलेल्या सूचनांचे पालन केल्यामुळे चौधरी यांच्या बँक खात्यावरुन तत्काळ वेगवेगले व्यवहार झाले. ज्यामुळे त्यांच्या बँक खात्यातून तब्बल पाच लाख रुपये हस्तांतरित केले गेले. सुरुवातीला रु. 83,760 व्यवहार झाला. त्यानंतर त्यानंतर चार लाख रुपये आणि त्यानंतर 20,012 आणि 49,101 रुपयांचे असे आणखी चार झाले. सर्व मिळून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल पाच लाखांहून अधिक रक्कम गायब झाली.

कायदेशीर कारवाई:

चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांद्वारे भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 डी अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या ऑनलाइन घोटाळ्यामागील गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ग्राहकांची गोपीनिय माहिती चोरुन ग्राहकांना गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif