27 सप्टेंबरपासून झालेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे कॉंग्रेसच्या शेतीविषयक कायद्याच्या चुकीच्या माहितीला उत्तर देणारे आहे: स्मृती इराणी ; 28 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Dec 28, 2020 11:56 PM IST
देशभरात कोरोना व्हायरसची परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला थंडीचे दिवस सुरु झाल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. तर थंडीच्या दिवसात मजा घेण्यासाठी लोक घराबाहेर पडत असून त्यांना थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी सुद्धा लागून सुट्ट्या आल्याने नवं वर्षाच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी जाऊन पोहचत आहेत. यातच आता हिमाचल प्रदेशातील शिमला येथे बर्फवृष्टीमुळे रस्त्ये बंद झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी वर्षातील अखेरची मन की बात पार पडली. त्यावेळी त्यांनी देशासाठी सुद्धा काहीतरी संकल्प करा असे म्हटले. तर आज नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगाल पर्यंतच्या शालीमार या 100 व्या किसान रेलसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झेंडा दाखवणार आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोविड19 साठीच्या Relief Bill वर स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार ट्रंम्प यांनी असे म्हटले की, बेरोजगारांच्या पुर्नवर्सनासाठी प्रयत्न करावेत. PPP साठी पैसे द्या आणि एअरलाईन्स मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी सुद्धा पुन्हा आपल्या कामावर परत आणा. त्याचसोबत लस वितरण करण्यासाठी अधिक पैसे द्या आणि बरेच काही असे त्यांनी रिलिफ बिलात म्हटले आहे.