ठळक बातम्या

Mamta Kulkarni Resigns As Mahamandaleshwar: नाराजीनंतर ममता कुलकर्णी यांचा महामंडलेश्वर पदाचा राजीनामा; इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ

Bhakti Aghav

आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांच्यात ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पद देण्यावरून झालेल्या वादानंतर आता ममत कुलकर्णी यांनी महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. आता ममताने एक व्हिडिओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

Ahmedabad Bomb Threat: जेद्दाह-अहमदाबाद विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी, सफाई कर्मचाऱ्यांना सापडला होता धमकीचा संदेश

Shreya Varke

अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरिल एका विमानात बॉम्ब असल्याचे पत्र सापडले होते. या पत्रामुळे विमानात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आज सकाळी आंतरराष्ट्रीय विमानात बॉम्बची धमकी देणारे पत्र सापडले, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी विमानात शोधमोहीम सुरु केली होती. शोधमोहीम केली असता सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या जेद्दाह-अहमदाबाद विमानात आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Ranveer Allahbadia Apologised: युट्युबर रणवीर अल्लाहबादीया कडून वादग्रस्त विधानानंतर माफीनामा

Dipali Nevarekar

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रणवीरला फटकारलं आहे .

IND vs ENG 2nd ODI: कटकमध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला? कोणाला देण्यात आले श्रेय?

Amol More

रोहित शर्माने 90 चेंडूत 119 धावांची खेळी केली. त्याने त्याच्या खेळीत 12 चौकार आणि 7 षटकार मारले. या शानदार खेळीसाठी रोहित शर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Advertisement

Fight in Gwalior: 5 रुपयावरून प्रवासी आणि ड्रायव्हरमध्ये हाणामारी, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Shreya Varke

मारामारीच्या बहुतांश घटना रस्त्यावरच पाहायला मिळतात. अशीच एक घटना ग्वाल्हेरमधून समोर आली आहे. जिथे प्रवासी भाड्यावरून जोरदार भांडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ही घटना पडाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलबाग चौकात घडली. भाड्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर प्रवाशाने ई-रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली.

Lymphatic Filariasis Disease:संसर्गजन्य आजार लिम्फॅटिक फायलेरियामुळे सरकार चिंतेत, प्रसार थांबवण्यासाठी मोदी सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरु

Shreya Varke

लिम्फॅटिक फायलेरियासिस या दुर्बल आजाराने देशात शिरकाव केला आहे. लिम्फॅटिक फिलेरियासिस (एलएफ), ज्याला सामान्यतः एलिफॅन्टियासिस देखील म्हणतात, हा एक गंभीर संसर्गजन्य रोग आहे जो प्रामुख्याने लिम्फॅटिकवर प्रभावित करतो. हा रोग फिलेरियासिस नावाच्या परजीवीमुळे होतो, जो डासांद्वारे मानवांमध्ये पसरतो. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिम्फॅटिक फिलेरियासिस निर्मूलन मोहिमेवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग, कशाच्या आधारावर वाढणार वेतन आणि पेन्शन?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आठवा वेतन आयोग केंद्र सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बराच लाभदाही ठरेल असेल बोलले जात आहे. त्याचसंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यासाठी आज एक बैठक पार पडत आहे. ज्यामध्ये महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

NZ vs SA 2nd ODI Tri-Series 2025 Scorecard: दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड पुढे ठवले 305 धावांचे लक्ष्य, मॅथ्यू ब्रिट्झकेने झळकावले शतक, येथे पहा स्कोअरकार्ड

Jyoti Kadam

लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

Maharashtra: वर्ध्यात इन्स्टाग्राम स्टोरीवरून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या, काय आहे नेमके प्रकरण, पाहा

Shreya Varke

एका इंस्टाग्राम स्टोरीवरून महाराष्ट्रात एका 17 वर्षीय मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे . महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट परिसरातील पिंपळगाव गावातील हि घटना असल्याचे समोर आले आहे. एका इंस्टाग्राम पोस्टवरून झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. महिनाभरापूर्वी, पीडित, हिमांशू आणि आरोपी, मानव जुमनाके (21) यांनी सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकली होती, असे हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने ऑनलाइन पोस्टवर अधिक तपशील न देता सांगितले.

Matthew Breetzke Record: मॅथ्यू ब्रीट्झकेने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात केली ऐतिहासिक कामगिरी; नोंदवली सर्वाधिक धावसंख्या

Jyoti Kadam

पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेत ब्रीट्झकेने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 150 धावा केल्या. ब्रीट्झके एकदिवसीय पदार्पणात 150 धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.

YouTube Controversy: रणवीर अलाहबादिया आणि समय रैना यांच्याविरोधात तक्रार; आई-वडिलांमधील लैंगिक संबंधाबाबत वक्तव्य भोवले

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

YouTube शोमध्ये कथित अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल YouTuber रणवीर अलाहबादिया, विनोदी कलाकार समय रैना आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. जनतेच्या संतापानंतर अधिकारी कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहेत. अधिक वाचा.

Kriti Kharbanda Hot Pics and Video: बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री क्रिती खरबंदाच्या फोटोने चाहते घायाळ, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Shreya Varke

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदा तिच्या हटके लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. चाहते क्रिती खरबंदाच्या फोटोची नेहमीच वाट पहात असता. दरम्यान, अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या बोल्ड अवताराने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नुकतेच तिने फ्लोरल ड्रेसमधील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात क्रिती अत्यंत हॉट दिसत आहे. क्रितीने हलका मेकअप केला असून केसांची खास स्टाइल तिला उठून दिसत आहे, ज्यामुळे ती अधिकच आकर्षक दिसत आहे.

Advertisement

Rohit Sharma New Record: रोहित शर्माने केला मोठा विक्रम; ख्रिस गेलला मागे टाकत सर्वाधिक षटकार मारणारा ठरला दुसरा फलंदाज

Jyoti Kadam

भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 9 फेब्रुवारी रोजी कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 4 विकेट्सने पराभव केला.

PM Kisan Yojana 19th Installment: 24 फेब्रुवारीला पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता येणार, शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक

Shreya Varke

पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता फेब्रुवारी २०२५ च्या अखेरपर्यंत पात्र शेतकऱ्यांना वितरित केला जाईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत १८ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.

Nita Ambani congratulates MI Cape Town : SA20 2025 चा पहिला विजेता ठरल्याबद्दल नीता अंबानी यांनी केले MI Capचे अभिनंदन

Jyoti Kadam

रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी शनिवारी एमआय केप टाउनचे अभिनंदन केले.

Amit Thackeray: चिरंजीवांना आमदारकी? शिवतीर्थावरील भेटीनंतर अमित ठाकरे चर्चेत; तीर्थरूप आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विधनसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे अमित ठाकरे यांची आमदार होण्याची संधी हुकली. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील भेटीमुळे ती त्यांना विधानपरिषदेच्या निमित्ताने मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Advertisement

Heart Attack While Dancing: मध्य प्रदेशात लग्न समारंभात डान्स करताना 23 वर्षीय तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)

Bhakti Aghav

एका लग्न समारंभात महिलांच्या संगीत कार्यक्रमादरम्यान, ही तरुणी स्टेजवर डान्स करताना अचानक पडली आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Matthew Breetzke: मॅथ्यू ब्रीट्झके आहे तरी कोण? न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणारा एलएसजीचा खेळाडू

Jyoti Kadam

मॅथ्यू ब्रीट्झकेला एलएसजीने 57 लाख रुपयांना विकत घेतले आहे. तो 2025 च्या सर्वात लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करणार आहे.

Prayagraj Traffic Update: महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी भाविकांनी केली गर्दी, २०० ते ३०० किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी, पाहुणे येऊ शकत नसल्यामुळे अनेक लग्नही रद्द

Shreya Varke

महाकुंभमेळ्यादरम्यान भाविकांची गर्दी होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रयागराजला गर्दी पाहायला मिळत आहे. अमृतस्नानानंतर गर्दी कमी होईल असे वाटत होते. मात्र, नेमकं याच्या उलट दिसत असून संपूर्ण महाकुंभमेळ्यादरम्यान वाहनांची गर्दी पूर्वीपेक्षा आता लक्षणीय वाढली आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण तुपाशी, बाकीच्या योजना उपाशी; सरकारी भाऊ देणार का लाभ?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना इतर विभागांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे पुढे येत आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या तुलनेत इतर विभागांच्या निधीस कात्री लावली जात आहे किंवा त्यास स्थगितीही दिली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

Advertisement
Advertisement