कधी संपणार Coronavirus महामारी? आता COVID-19 वर विजय मिळवण्यासाठी लस हीच मोठी आशा- WHO Chief Tedros Adhanom
अशात विविध कंपन्यांच्या लसीमुळे (Vaccines) कोविड महामारी संपण्याची आशा आता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख Tedros Adhanom यांनी हे सांगितले.
जगभरात कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीशी लढण्यासाठी मोठा लढा सुरु आहे. अशात विविध कंपन्यांच्या लसीमुळे (Vaccines) कोविड महामारी संपण्याची आशा आता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख Tedros Adhanom यांनी हे सांगितले. ते म्हणाले, ‘लसीसोबतच या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी ज्या आरोग्यविषयक उपाययोजना प्रभावी ठरल्या आहेत त्याही स्वीकाराव्या लागतील. ऑक्सफोर्ड विद्यापीठात कोविड-19 ची लस 90 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचे औषध निर्माता अॅस्ट्रॅजेनेका यांनी सांगितले. त्यानंतर डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी यावर भाष्य केले. फायझर आणि मॉडर्ना नंतरची शेवटच्या स्टेजची आकडेवारी नोंदवणारी ही तिसरी मोठी कंपनी आहे.
ट्रेडोस पुढे म्हणाले, ‘या वैज्ञानिक कर्तृत्वाचे महत्त्व कमी लेखले जाऊ शकत नाही. इतिहासात कोणतीच लस इतक्या वेगाने विकसित झाली नाही. वैज्ञानिकांच्या समुदायाने लसीच्या विकासासाठी एक नवीन मानक स्थापित केले आहे. आता आंतरराष्ट्रीय समुदायाने यातील प्रत्येक लसीच्या उपलब्धतेसाठी एक नवीन मानक निश्चित केले पाहिजे, कारण ज्या वेगाने लसी तयार करण्यात आल्या आहेत त्याच वेगाने त्या तातडीनेही वितरितही करण्यात आल्या पाहिजेत.’
लसीच्या वितरणामध्ये सर्वात गरीब आणि हालाकीच्या देशांना ही लस मिळण्याच्या शर्यतीत पायदळी तुडवू नये अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. डब्ल्यूएचओने लसीपर्यंत पोहोचण्यासाठी कोविड-19 टूल एक्सेलेरेटर स्थापित केले आहे. लस खरेदीसाठी परवडणारी किंमत, प्रमाण आणि वेळ यासाठी आतापर्यंत 187 देश COVAX Facility मध्ये सहभागी झाले आहेत. डब्ल्यूएचओ प्रमुखांच्या मते, मोठ्या प्रमाणात लस, चाचण्या, उपचार करण्यासाठी आणि वितरण करण्यासाठी 4.3 बिलियन डॉलरची तातडीने गरज आहे, तर पुढच्या वर्षी तर यासाठी 23.8 बिलियन डॉलर्सची गरज भासणार आहे. (हेही वाचा: Coronavirus Vaccination: अमेरिकेत डिसेंबरपासून सुरु होऊ शकते कोरोना विषाणू लसीकरण)
ते म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज आहे की, जर वैद्यकीय उपाय लवकरात लवकर आणि व्यापकपणे उपलब्ध केले गेले तर, 2025 च्या अखेरीस जगातील उत्पादन सुमारे 9 ट्रिलियन डॉलरनी वाढू शकेल.’