दुसऱ्या जागतिक युद्धानंतरची सर्वात मोठी चोरी; जर्मनीच्या वस्तुसंग्रहालयातून अब्जावधी रुपयांचे दागिने गायब

जर्मन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दुसर्‍या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी चोरी आहे. हे संग्रहालय ड्रेस्डेनच्या राजवाड्यात आहे. इथे चार हजारांहून अधिक मौल्यवान दागिने व हस्तिदंती वस्तू, सोने, चांदी तशीच अनेक अमूल्य रत्ने आहेत.

ग्रीन व्हॉल्ट चोरी (संग्रहित संपादित प्रतिमा)

जर्मनीच्या ड्रेस्डेन (Dresden) येथील राजकीय वस्तूसंग्रहालय 'ग्रीन व्हॉल्ट' (Green Vault) मधून जवळजवळ 80 अब्ज रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या डायमंड ज्वेलरीचे सेट चोरीला गेले आहेत. सोमवारी पोलिस आणि संग्रहालय संचालकांनी ही माहिती दिली. जर्मन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दुसर्‍या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी चोरी आहे. हे संग्रहालय ड्रेस्डेनच्या राजवाड्यात आहे. इथे चार हजारांहून अधिक मौल्यवान दागिने व हस्तिदंती वस्तू, सोने, चांदी तशीच अनेक अमूल्य रत्ने आहेत. चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये 18 व्या शतकातील सॅक्सोनी (Saxony) शासक ऑगस्टस द स्ट्रॉन्गच्या संग्रहालयातील मोल्यावान हिऱ्यांचाही समावेश आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, सोमवारी पहाटे वीज पुरवठा खंडित झाल्यावर, चोरट्यांनी संग्रहालयात तोडले. यावेळी सर्वत्र अंधार होता तसेच वीज नसल्यामुळे संग्रहालयात गजरही नव्हता. परंतु संपूर्ण संग्रहायालयावर पाळत ठेवणारा कॅमेरा कार्यरत होता, ज्यामध्ये दोन लोक खिडकी तोडून संग्रहालयात प्रवेश करताना दिसत आहेत. 2017 मध्ये बर्लिनमधील बोडे संग्रहालयात 24 कॅरेट 100 किलो सोन्याचे नाणे चोरीला गेले होते. या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध तर नाही ना या गोष्टीचाही पोलीस तपास करत आहेत. (हेही वाचा: गुजरात येथे मुकबधिर असल्याचे नाटक करत भामट्याने पळवले 40 लाख रुपयांचे हिरे)

चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये 100 हून अधिक मौल्यवान दागिन्यांचा सानावेश आहे. सोमवारी सकाळी दोन जणांनी हे चोरी केली. यामध्ये एक अब्ज युरो पेक्षा जास्त प्राचीन दागिन्यांची चोरी झाली आहे. उत्तरोत्तर इतिहासातील ही सर्वात मोठी कला चोरी असल्याचे सांगितले जात आहे. संग्रहालयात आग लागून चोरांनी राजवाड्यात प्रवेश केला आणि त्यानंतर वीजपुरवठा बंद करुन या दागिन्यांची चोरी केली. 1723 मध्ये सॅक्सोनी शासक ऑगस्टस द स्ट्रॉन्ग यांनी ग्रीन व्हॉल्टची स्थापन केली होती. हे संग्रहालय यूरोपमधील सर्वात प्राचीन संग्रहालयापैकी एक म्हणून ओळखले जाते. इथे युरोप खंडातील सर्वात मोठा खजिना संग्रह आहे.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

दुसऱ्या जागतिक युद्धानंतरची सर्वात मोठी चोरी; जर्मनीच्या वस्तुसंग्रहालयातून अब्जावधी रुपयांचे दागिने गायब

World's Most Walkable City च्या यादी मध्ये मुंबई सर्वात खालच्या दहा शहरांमध्ये; अभ्यासातून समोर आला निष्कर्ष

World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया

Advertisement

COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण

Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement