Hackers May Increase Deepfakes: डीपफेक तंत्रज्ञानाच्या धोक्यामध्ये होऊ शकते वाढ; हॅकर्स प्राप्त करत आहेत Artificial Intelligence, Machine Learning चे ज्ञान

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, काजोल आणि कतरिना कैफ यांचा समावेश असलेल्या अलीकडील डीपफेक वादांमुळे भारतात हा सार्वजनिक मुद्दा बनला आहे. भारत आणि अमेरिका या दोन प्रमुख देशांमध्ये निवडणुका येऊ घातल्या आहेत, अशात सायबरसुरक्षा आणि चुकीची माहिती देणार्‍या खोट्या गोष्टी पसरवण्याची शक्यता वाढली असल्याचे तज्ञांचे मत आहे.

Cyber-attack | Representational Image (Photo Credit: PTI)

Hackers May May Increase Deepfakes: गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड बदल झाले आहेत. एआयच्या (Artificial Intelligence) आगमनानंतर लोकांचे काम सोपे झाले असतानाच अनेक प्रकारचे धोकेही निर्माण झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या डीपफेक व्हिडिओ (Deepfake Videos) आणि फोटोंमुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. वर्तमानपत्र, टीव्ही बातम्या आणि सोशल मीडियावर डीपफेक व्हिडिओ चर्चेचा विषय बनले आहेत. डीपफेक तंत्रज्ञानाचा बळी ठरल्याचे सातत्याने प्रकरणे समोर येत आहेत.

आता भारत सरकारही डीपफेकवर कठोर असल्याचे दिसते. आता यूट्यूबनेही डीपफेक्सवर मोठे पाऊल उचलले आहे. 2023 मध्ये ओपनएआयच्या चॅटजीपीटी सारख्या मोठ्या लँग्वेज मॉडेल्स (एलएलएम) च्या विकासासह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा सार्वजनिक क्षेत्रात 'स्फोट' झाला. तज्ज्ञांच्या मते, हा ट्रेंड 2024 नंतरही कायम राहण्याची अपेक्षा आहे. कारण हॅकर्स आणि सायबरसुरक्षा व्यावसायिक त्यांचा एआय आणि मशीन लर्निंग (ML) चा वापर वाढवत आहेत. यामुळे डीपफेक्स व्हिडिओमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

अलीकडेच, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे दोन नवीन डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते, ज्यात कथितरित्या एका तथाकथित गुंतवणूक प्लॅटफॉर्म 'क्वांटम एआय'चा प्रचार केला गेला होता. यामध्ये दावा केला होता की, या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कामाच्या पहिल्याच दिवशी वापरकर्ता $3,000 (अंदाजे 2.5 लाख रुपये) कमवू शकेल. आगामी काळात डीपफेक व्हिडिओ बनवण्यासारखे हल्ले अधिक वाढतील कारण सायबर गुन्हेगार त्यांचा एआय साधनांचा वापर वाढवत आहेत.

माहिती सुरक्षा कंपनी CyberArk नुसार, 2024 मध्ये भारताच्या सायबर सुरक्षेसाठी डीपफेक व्हिडिओ मोठा धोका निर्माण करेल. चुकीची माहिती पसरवणे, लोकांच्या मतात फेरफार करणे आणि गंभीर पायाभूत सुविधांमध्ये व्यत्यय आणणे या उद्देशाने हे हल्ले व्यक्ती, व्यवसाय आणि अगदी सरकारी संस्थांना लक्ष्य करतील. या हल्ल्यांचे आर्थिक परिणाम गंभीर असू शकतात, ज्यामुळे प्रतिष्ठेचे नुकसान होऊ शकते, गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होऊ शकतो आणि आर्थिक अस्थिरता देखील येऊ शकते. (हेही वाचा: Cyber Attacks in 2024: सायबर गुन्हेगार 2024 मध्ये करू शकतात AI शी निगडीत हल्ले, अहवालात समोर आली धक्कादायक माहिती)

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, काजोल आणि कतरिना कैफ यांचा समावेश असलेल्या अलीकडील डीपफेक वादांमुळे भारतात हा सार्वजनिक मुद्दा बनला आहे. भारत आणि अमेरिका या दोन प्रमुख देशांमध्ये निवडणुका येऊ घातल्या आहेत, अशात सायबरसुरक्षा आणि चुकीची माहिती देणार्‍या खोट्या गोष्टी पसरवण्याची शक्यता वाढली असल्याचे तज्ञांचे मत आहे. या वाढत्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी, भारतीय संस्थांनी डीपफेक शोधणे आणि ते कमी करण्याच्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक केली पाहिजे, डीपफेकच्या धोक्यांबद्दल जागरुकता वाढवली पाहिजे आणि मजबूत सायबर सुरक्षा धोरण विकसित केले पाहिजे, असे संशोधक म्हणाले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now