Dark Comets Hidden Threats: 'डार्क धूमकेतू', पृथ्वीसाठी ठरु शकतात मानवी कल्पनेपेक्षाही अधिक धोकादायक
आंतराळ अभ्यासक (Space Research) सांगतात की, मानवाने केलेल्या कल्पनेपेक्षाही हा धोका अधिक मोठा आणि आव्हानात्मक असू शकतो. हे 'डार्क धुमकेतू' म्हणजे अदृश्य, वेगाने फिरणारे अंतराळ खडक असातात म्हणे.
आंतराळातील नानाविध ग्रह, तारे अथवा नव्या शक्तींमुळे पृथ्वीला धोका (Earth Threats) असल्याचे अनेक संकेत संशोधकांनी यापूर्वीही दिले आहेत. असे असले तरी, ही पृथ्वी अनाधीकाळापासून ही जीवसृष्टी, वातावरण आणि घडामोडींसह निरनिराळ्या बदलांची साक्षीदार राहीली आहे. आताही पृथ्वीला म्हणे 'डार्क धूमकेतू' (Dark Comets) धोकादायक ठरु शकतो. आंतराळ अभ्यासक (Space Research) सांगतात की, मानवाने केलेल्या कल्पनेपेक्षाही हा धोका अधिक मोठा आणि आव्हानात्मक असू शकतो. हे 'डार्क धुमकेतू' म्हणजे अदृश्य, वेगाने फिरणारे अंतराळ खडक असातात म्हणे. त्याबाबत पुरेसा विस्तृत तपशील उपलब्ध नसला तरी, हे खडक बहुदा सौर मंडळाच्या दूरच्या भागातून उद्भवतात आणि कधीकधी आपल्या ग्रहाच्या (पृथ्वी) जवळ फिरतात. हे धोकादायक असले तरी, ते पाणी आणि इतर मौल्यवान घटक देखील पृथ्वीला देऊ शकतात.
धूमकेतू कोठून येतात?
अभ्यासक सांगतात की, धूमकेतू सहसा बाह्य सौर मंडळातून येतात. जेथे पाण्यासारखे पदार्थ गोठवण्याची क्षमता ठेवणारे अत्यंत कमी तापमान असते. या धुमकेतुंमुळे काहीवेळा ग्रहांचे गुरुत्वाकर्षण प्रचंड प्रमाणात खेचणे जाते. तसेच त्यामुळे ग्रहांच्या कक्षा विस्कळीत होतात. परिणामी ते आतील सूर्यमालेकडे ढकलले जातात. धूमकेतू सूर्याजवळ येताच ते विघटित होतात. ज्यामुळे नवे बदल होऊन त्याचे परिणाम आंतराळ आणि काही प्रमाणात पृथ्वीवरही पाहायला मिळतात. अभ्यासकांनी केलेल्या दाव्यानुसार, मंगळ आणि गुरू दरम्यान आढळणारे लघुग्रह अधिक खडकाळ आहेत. ते सूर्याची उष्णता जास्त काळ सहन शकतात आणि तप्त वातावरणातही अस्थित्व कायम ठेऊ शकतात. मात्र, असे असले तरी, ते देखील अस्थिर कक्षेत संपुष्टात येऊ शकतात, ज्यामुळे पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो. (हेही वाचा, Biggest Comet Heading Toward Earth: माउंट एव्हरेस्टपेक्षा तीनपट मोठ्या धूमकेतूचा स्फोट; आता झेपावत आहे पृथ्वीच्या दिशेने)
स्पेस रॉक प्रकार
इकारस जर्नलने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, डार्क धूमकेतू, नवीन ओळखला जाणारा स्पेस रॉक प्रकार, लघुग्रह आणि धूमकेतू या दोन्हीची वैशिष्ट्ये प्रदर्शित करतो. खगोलशास्त्रज्ञांनी त्यांचे मूळ शोधले आहे. हे गडद धूमकेतू, जे फक्त दहा किलोमीटर पलीकडे आहेत. ते कोणतेही दृश्यमान आउटगॅसिंग दर्शवत नाहीत परंतु "नॉन-ग्रॅव्हिटेशनल" प्रवेग अनुभवतात, याचा अर्थ असा होतो की इतर शक्ती त्यांच्या कक्षा बदलत आहेत.
संशोधकांनी असे सुचवले आहे की डार्क धूमकेतू शोधण्यासाठी खूप कमी पातळीवर बाहेर पडतात. त्यांचे जलद फिरणे हे दर्शवते की ते आंतरिकदृष्ट्या मजबूत आहेत आणि बहुधा मोठ्या खंडित वस्तूंमधून येतात. धूमकेतू मंगळ आणि गुरू यांच्यातील मुख्य लघुग्रहांच्या पट्ट्यातून उद्भवले असावेत, ज्यावर शनीच्या (ग्रह) गुरुत्वाकर्षण शक्तींचा प्रभाव आहे. त्यांच्या अप्रत्याशित कक्षा आणि अद्वितीय गुणधर्मांमुळे, गडद धूमकेतू विशेषतः धोकादायक आहेत. पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी, त्यांच्या हालचाली शोधण्यासाठी आणि अंदाज लावण्यासाठी अधिक तपशीलवार अभ्यास आवश्यक आहेत, असल्याचेही अभ्यासक सांगतात.