Govt's warning For Android, Chrome-Firefox Users: सावध रहा! तुमचा फोनला सायबर फसवणुकीचा धोका; अँड्रॉइड, क्रोम आणि फायरफॉक्स युजर्ससाठी सरकारने जारी केला 'हाय रिस्क' अलर्ट

सायबर फसवणूक करणारे अँड्रॉइड तसेच मोझीला फायरफॉक्स युजर्सच्या डिव्हाइसमध्ये अनधिकृत प्रवेश करून संवेदनशील माहिती मिळवू शकतात, अनियंत्रित कोड अंमलात आणू शकतात आणि अशा सिस्टमवर नियंत्रणही मिळवू शकतात.

Cybersecurity | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Govt's warning for Android, Chrome- Firefox Users: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In), अँड्रॉइड (Android), मोझीला फायरफॉक्स (Mozilla Firefox) आणि गुगल क्रोम (Google Chrome) वेब ब्राउझर वापरणाऱ्या युजर्ससाठी सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. या तीनही सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत. यामुळे सायबर फसवणूक करणारे अँड्रॉइड तसेच मोझीला फायरफॉक्स युजर्सच्या डिव्हाइसमध्ये अनधिकृत प्रवेश करून संवेदनशील माहिती मिळवू शकतात, अनियंत्रित कोड अंमलात आणू शकतात आणि अशा सिस्टमवर नियंत्रणही मिळवू शकतात.

अहवालानुसार, प्रभावित झालेल्या सॉफ्टवेअरमध्ये अँड्रॉइड 12, 12L, 13, 14 यासह मोझीला फायरफॉक्सचे 124.0.1 पूर्वीचे व्हर्जन तसेच 115.9.1 पूर्वीचे मोझीला फायरफॉक्स ईएसआर (Mozilla Firefox ESR) व्हर्जन समाविष्ट आहे.

फ्रेमवर्क, सिस्टम, मीडियाटेक घटक, वाइडवाइन, क्वालकॉम घटक आणि क्वालकॉम क्लोज-सोर्स घटकांमधील त्रुटी यांमुळे अँड्रॉइडमध्ये ही समस्या उद्भवली आहे. याआधी इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने आयफोन, आयपॅड किंवा मॅकबुक आणि व्हिजन प्रो (Vision Pro) हेडसेट सारख्या उत्पादनांमध्येही गंभीर सुरक्षा त्रुटींचा इशारा दिला आहे. त्यांच्यामते हॅकर्स ब्राउझरच्या त्रुटींचा फायदा घेत, डिव्हाइसवरील पासवर्ड, फोटो आणि आर्थिक डेटा यासारख्या संवेदनशील माहितीमध्ये प्रवेश करू शकतात. (हेही वाचा: High-Risk Warning For Apple Users: तुम्हीही ॲपलची उत्पादने वापरत असाल तर व्हा सावध! केंद्राने iPhone, iPad आणि MacBook वापरकर्त्यांसाठी जारी केली 'हाय रिस्क वॉर्निंग')

अशा धोक्यापासून सुरक्षित कसे राहायचे?

  • अँड्रॉइड वापरकर्त्यांनी सायबर हल्ल्याचा धोका टाळण्यासाठी वेळोवेळी त्यांचे सॉफ्टवेअर अपडेट करत राहावे.
  • क्रोम आणि फायरफॉक्स वेब ब्राउझरच्या वापरकर्त्यांनीदेखील असा कोणताही धोका टाळण्यासाठी त्यांचे ब्राउझर अपडेट केले पाहिजेत.
  • तुमच्या डिव्हाइसवरील सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील डेटाचा नियमितपणे बॅकअप घ्या.
  • डिव्हाइसवर नेहमी मजबूत पासवर्ड वापरा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now