Cybercrime | (Photo credit: archived, edited, representative image

मुंबई मध्ये 'माझी लाडकी बहीण' योजनेच्या (Ladki Bahin Yojana) नावाचा वापर करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आरोपींनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदतीचे आश्वासन देऊन अनेक व्यक्तींची बँक खाती उघडली आणि त्यांचा वापर सायबर गुन्ह्यांद्वारे आणि मनी लाँड्रिंगद्वारे मिळालेल्या निधीसाठी केला, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

प्रथमदर्शनी, या खात्यांद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले, त्यापैकी बरेच सायबर फसवणूक, मनी लाँड्रिंग, व्यापार आणि काळ्या पैशाचे रूपांतरण यांच्याशी जोडलेले आहेत. पोलिसांनी सांगितले की, भोळ्या भाबड्या लोकांना, प्रामुख्याने कमी उत्पन्न असलेल्या वर्गातील लोकांना आकर्षित केल्यानंतर, आरोपी त्यांची बँक खाती सायबर फसवणूक करणाऱ्यांना "विकत" होता.

प्राथमिक तपासानुसार, सुमारे 2500 बँक खाती उघडण्यात आली होती, त्यापैकी काही सायबर फसवणूक करणाऱ्यांना आणि मनी लाँडरिंग करणाऱ्यांना विकण्यात आल्याचा आरोप जुहू पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने केला आहे.

पोलिसांनी कारवाई करत या घोटाळ्याशी संबंधित 100 पेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह बँक अकाऊंट्स फ्रीझ केली आहेत आणि या खात्यांमधील 19,43,779 रुपये जप्त केले आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, बहुतेक भूललेले हे पुरुष आहेत, ज्यांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये सरकारी मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, वास्तवात ही योजना केवळ पात्र महिला लाभार्थ्यांसाठीच आहे.

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक

, ज्यामुळे अविनाश कांबळे (वय वर्ष 25) आणि दोघांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी सांगितले की, अविनाश कांबळे झोपडपट्टीवासीयांना बँक खाती उघडण्याची आणि त्याच्या सेवेसाठी 1000 रुपये आकारण्याची ऑफर देत असे. नक्की वाचा: Ladki Bahin Yojana: 'गणेश ब्लॉकमधून काढ', लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन बॉयफ्रेंड फरार, तरुणीची सोशल मीडियावर कैफीयत.

"या टोळीने बँक खात्यांशी जोडलेले पासबुक, आधार कार्ड आणि पॅन कार्डसह सिम कार्ड आणि कागदपत्रे गोळा केली, जी कांबळेने नंतर प्रत्येकी 4 हजार रुपयांना विकली," असे पोलिसांनी सांगितले.