WhatsApp Fraud Alert: व्हॉट्सअॅपच्या 'या' मेसेजवर चुकूनही करू नका क्लिक; फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

फसवणूक करणारे तुमच्या मोबाईलवर एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप मेसेज पाठवतात, ज्यामध्ये बनावट वीज बिलाचा तपशील असतो आणि थकीत वीज बिल जमा करण्यासाठी लिंक दिली जाते.

WhatsApp | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

WhatsApp Fraud Alert: व्हॉट्सअॅपवर वीज बिलासंदर्भात मेसेज आल्यास सावध रहा. कारण, आजकाल वीज बिलाच्या नावाखाली मोठी फसवणूक केली जात आहे. खरेतर, फसवणूक करणारे तुमच्या मोबाईलवर एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप मेसेज पाठवतात, ज्यामध्ये बनावट वीज बिलाचा तपशील असतो आणि थकीत वीज बिल जमा करण्यासाठी लिंक दिली जाते. त्यानंतर वीज बिल भरण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. यानंतर, व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या नावावर तुम्हाला तपशील विचारले जातात. अशा प्रकारे हॅकर्स फसवणुकीच्या घटना घडवून आणतात.

इलेक्ट्रिसिटी नियम काय आहे?

भारतीय विद्युत नियमांनुसार, जर ग्राहकाने वीज बिल वेळेवर भरले नाही, तर त्याला 3 महिन्यांची मुदत दिली जाते जेणेकरून ग्राहक तीन महिन्यांत वीज बिल भरू शकेल. यासोबतच ग्राहकाला 15 दिवसांचा नोटीस कालावधीही देण्यात येतो (हेही वाचा - WhatsApp New Feature: आता व्हॉट्सअॅपवर ग्रूपमध्ये एकाचवेळी 512 सदस्यांना करता येणार अॅड; 'या' स्टेप्स फॉलो करून घ्या नव्या फिचरचा फायदा)

फसवणूक टाळण्यासाठी 'हे' करा -

सायबर तज्ज्ञांच्या मते, वीज विभागाकडून थकीत वीजबिल भरण्यासाठी व्हॉट्सअॅप किंवा सामान्य संदेश पाठवले जात नाहीत. असे मेसेज मेंटेनन्स कडून पाठवले जातात. वीज बिलाचा टॅरिफ प्लॅन संपला तर वीज खंडित होते. अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅप आणि सामान्य संदेशांवर विश्वास ठेवू नये.

नेहमी विश्वसनीय अॅप्स वापरा, जे तुमच्या वीज बिलाचा तपशील K क्रमांकासह दाखवतात. वीज बिल भरण्याची शिफारस करणाऱ्या कोणत्याही अज्ञात स्रोत लिंकवर क्लिक करू नका. अॅपवर पडताळणीसाठी कोणतेही अनावश्यक लिंक, स्कॅनिंग QR किंवा तपशील देऊ नका. वीजबिल भरण्यासाठी वीज विभागाकडून क्यूआर कोड जारी केला जात नाही. जर वापरकर्त्याचे घर, कार्यालयात वीज कनेक्शन असेल तर हे जाणून घ्या की, वीज विभागाकडून कॉल किंवा मेसेज करून पडताळणी केली जात नाही.