Cyber Attacks: भारतातील शैक्षणिक संस्था आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मना सायबर हल्ल्याचा सर्वाधिक धोका; अहवालात धक्कादायक खुलासा
यामध्ये हॉवर्ड युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांवरील रॅन्समवेअर हल्ल्यांचा समावेश आहे
‘सायबर थ्रेट टार्गेटिंग द ग्लोबल एज्युकेशन सेक्टर’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, भारतीय शिक्षण क्षेत्र (Indian Education Sector) हे सायबर हल्ल्यांचे (Cyber Attacks) सर्वात मोठे लक्ष्य आहे. भारतानंतर अमेरिका, ब्रिटन, इंडोनेशिया आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो. अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की 2021 मधील याच कालावधीच्या तुलनेत 2022 च्या पहिल्या तीन महिन्यांत जागतिक शैक्षणिक क्षेत्रासाठी सायबर धोक्यात 20 टक्के वाढ झाली आहे.
अहवालानुसार, भारतीय शैक्षणिक संस्था आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म सायबर धोक्यांचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. दूरस्थ शिक्षणाचा अवलंब, शिक्षणाचे डिजिटायझेशन आणि ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मचा प्रसार कोविड-19 या जागतिक महामारीच्या काळात लक्षणीयरीत्या वाढला आहे, ज्यामुळे सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. सिंगापूरच्या एआय (AI) संचालित डिजिटल जोखीम व्यवस्थापन एंटरप्राइझ क्लाउडसेक (CloudSEK) च्या थ्रेट रिसर्च अँड इन्फॉर्मेशन अॅनालिटिक्स विभागाद्वारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
अहवालानुसार, गेल्या वर्षी आशिया आणि पॅसिफिकमध्ये आढळलेल्या एकूण धोक्यांपैकी 58 टक्के धोक्यांमध्ये भारतीय किंवा भारत-आधारित शैक्षणिक संस्था आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मला लक्ष्य केले गेले होते. यामध्ये BYJU, IIM कोझिकोड आणि तामिळनाडू डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन इत्यादी ऑनलाइन कोचिंग प्लॅटफॉर्मवरील सायबर हल्ल्यांचा समावेश आहे.
त्याच वेळी, युनायटेड स्टेट्स हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रभावित देश होता, जिथे एकूण 19 घटना नोंदवल्या गेल्या, ज्यामध्ये उत्तर अमेरिकेतील 86 टक्के धोके आहेत. यामध्ये हॉवर्ड युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांवरील रॅन्समवेअर हल्ल्यांचा समावेश आहे. यूएस हा जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रभावित देश होता, जिथे एकूण 19 घटना नोंदवल्या गेल्या, ज्याचा उत्तर अमेरिकेतील 86 टक्के धोक्यांचा वाटा आहे. यामध्ये हार्वर्ड विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित संस्थांवरील रॅम्समवेअर हल्ल्यांचा समावेश आहे. (हेही वाचा: बनावट वेबसाइट्सपासुन राहा सावध, अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते, या गोष्टी लक्षात ठेवा)
अहवालात म्हटले आहे की, कोविड-19 महामारीमुळे शिक्षण क्षेत्रात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शाळा, विद्यापीठे आणि संबंधित संस्थांनी ऑनलाइन आणि मुक्त-दूरस्थ शिक्षणाचा अवलंब केला आहे. यामुळे शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांचा डेटा आणि कागदपत्रांचे डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. एवढेच नाही तर देशात अनेक ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म कार्यरत आहेत जी अगदी प्री-स्कूल शिक्षणापासून ते सेवानिवृत्त व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करतात. म्हणूनच सायबर गुन्हेगार त्यांनाच टार्गेट करतात.