नवा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी 'या' स्पेसिफिकेशनवर जरुर लक्ष द्या अन्यथा फसवणूकीला बळी पडाल

त्यामुळे तुम्हाला उत्तम स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी मदत होईल. स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी त्याच्या ब्रँन्ड ऐवजी फोनमधील स्पेसिफिकेशनकडे लक्ष द्या.

Representational Image (Photo Credit: PTI)

नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तर काही महत्वांच्या गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला उत्तम स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी मदत होईल. स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी त्याच्या ब्रँन्ड ऐवजी फोनमधील स्पेसिफिकेशनकडे लक्ष द्या. तर जाणून घ्या असे कोणते स्पेसिफिकेशन आहेत जे एका स्मार्टफोनला उत्तम बनवते.  तर स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी त्याच्या डिस्प्लेकडे लक्ष द्या. कारण बहुतांश लोक ही कोणती स्क्रिन उत्तम असते, LCD योग्य आहे की Samsung चा एमोलेड यामध्ये गोंधळून जातात. खरंतर LCD डिस्प्ले मध्ये ब्राइटनेस अधिक असतो. मात्र एमोलेड पॅनल बॅटरीची बचत करतो. त्याचसोबत यामध्ये कलर सुद्धा छान दिसतात. अशातच LCD आणि एमोलेडमध्ये एक निवड करायची असल्यास तर नेहमीच एमोलेड निवडा.

दुकानदार तुम्हाला विविध स्मार्टफोन दाखवतील. पण त्यावेळी फोनच्या डिस्प्लेच्या रिफ्रेश रेट बद्दल जरुर जाणून घ्या. फोन 60Hz,90Hz, 120Hz,144Hz ते 480Hz पर्यंत येतात. हे तुमच्या फोनमधील Smoothness चे प्रमाण ठरवतात. अधिक रिफ्रेश रेट गेंमिंग सोप्पे बनवते. त्याचसोबत फोनच्या रेज्यॉल्यूशवर सुद्धा लक्ष द्या, एक 6 इंचाची स्क्रिन असलेला स्मार्टफोनसाठी HD रेज्यॉल्यूशन योग्य नसल्याचे मानले जाते. या साइजमध्ये Full HD रेज्यॉल्यूशन असणे उत्तम असते.

नेहमीच उत्तम ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारे फोन खरेदी करा. मार्केटमध्ये बहुतांश दोन ऑपरेटिंग सिस्टिम अॅन्ड्रॉइड आणि iOS उपलब्ध आहे. ज्याचे लेटेस्ट वर्जन अॅन्ड्रॉइड 11 आहे. तर iOS Apple चे ऑपरेटिंग सिस्टिम आहे. अॅन्ड्रॉइडच्या तुलनेत iOS डिवाइसमध्ये सिक्युरिटी अधिक दिली जाते.(OnePlus आणि Realme India कडून प्रोडक्ट वॉरंटी वाढवण्याची घोषणा)

तर एखाद्या स्मार्टफोनसाठी प्रोसेसर हा महत्वाचा भाग असतो. अशातच फोन खरेदी करताना प्रोसेसरकडे लक्ष द्या. मार्केटमध्ये Qualcomm, MediaTek Helio, Apple Bioni, Exynos सारख्या कंपन्यांचे प्रोसेसर उपलब्ध आहेत. मात्र या प्रोसेसरच्या नावाऐवजी त्यांच्या चिप साइजवर लक्ष द्यावे. चिप साइज जेवढी लहान असते तेवढाच त्याचा परफॉर्मेन्स उत्तम असतो. चिप साइज नॅनो मीटर मध्ये मोजतात. ही 12nm, 8nm, 7nm, 5nm च्या साइजमध्ये येतात. त्यामुळे 12nm ऐवजी 8nm किंवा 7nm चिपसेट असणारे स्मार्टफोन खरेदी करा. जर तुम्ही महागडा स्मार्टफोन खरेदी करणार असल्यास तेव्हा 5nm चिपसेट असणारा फोन पहा. Apple च्या लेटेस्ट Apple A14 Bionic ची चिप 5nm साइजमध्ये येते.

ज्या प्रमाणे फोनची गरज सध्या नागरिकांना अधिक असते तशीच गरज स्टोरेजची असते. त्याचसोबत अॅप रन करण्यासाठी अधिक इंटरनल स्टोरेजची गरज असते. त्याचसोबत अॅप रन करण्यासाठी सुद्धा अधिक इंटरनल स्टोरेजची आवश्यकता असते. जर तुम्ही बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असल्यास कमीतकमी 64GB स्टोरेज असणे गरजेचे आहे. तर मिड रेंज स्मार्टफोनसाठी 128GB आणि फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी 256GB स्टोरेजची गरज असते. तुम्ही फोनवर गेम खेळणार असल्यास किंवा अधिक अॅपचा वापर करणार असाल तर अधिक रॅम असणारा स्मार्टफोन फायदेशीर ठरेल. त्याचसोबत फोनचा कॅमेरा आणि बॅटरीकडे सुद्धा लक्ष द्या.