CSK vs KKR IPL 2025 25th Match Live Streaming: आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार लढत, येथे पाहून घ्या लाईव्ह सामन्याचा आनंद
चेन्नई संघाने पहिला सामना जिंकल्यानंतर सलग चार सामने गमावले आहेत, ज्यामुळे तो गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. दुसरीकडे कोलकाताने 2 सामने जिंकून तीन सामने गमावले असुन ते सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.
Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders, 25th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 25 वा सामना पाच वेळा विजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs CSK) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai) येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ मागील सामन्यातील पराभव विसरुन मैदानात उतरणार आहे. या हंगामात, कोलकाताचे नेतृत्व अंजिक्य राहाणे (Ajinkya Rahane) करत आहे. तर, ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जची कमान पुन्हा एमएस धोनीच्या (MS Dhoni) खांद्यावर आहे. दरम्यान, चेन्नई संघाने पहिला सामना जिंकल्यानंतर सलग चार सामने गमावले आहेत, ज्यामुळे तो गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. दुसरीकडे कोलकाताने 2 सामने जिंकून तीन सामने गमावले असुन ते सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.
किती वाजता सुरु होणार सामना?
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 2025 चा 25 वा सामना शनिवार, 11 एप्रिल रोजी खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार टॉसच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता मैदानावर असतील. (हे देखील वाचा: TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करुन नोंदवला चौथा विजय, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल)
कुठे पाहणार लाईव्ह सामना?
भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्क तसेच स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर टीव्हीवर KKR विरुद्ध CSK आयपीएल 2025 चा 25 वा सामना थेट पाहू शकतील. येथे वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचन ऐकण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar वर पाहू शकाल. येथे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकायला मिळेल.