IND vs NZ 3rd T20I Highlights: सुपर ओव्हरमध्ये जिंकला भारत, न्यूझीलंडमध्ये रचला इतिहास

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना बुधवारी हॅमिल्टनच्या सेडन पार्क येथे खेळला जाईल. हा सामना बुधवार, 29 जानेवारी रोजी रात्री 12:30 वाजता खेळला जाईल. तिसरा टी-20 सामना जिंकल्यास न्यूझीलंडच्या भूमीवर टीम इंडिया इतिहास रचेल.

29 Jan, 21:56 (IST)

हॅमिल्टनच्या सेडन पार्क मैदानात खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात यजमान न्यूझीलंडला टीम इंडियाला विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. टॉस गमावून पहिले फलंदाजी करत भारताने जिंकण्यासाठी किवी संघाला 180 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने केलेल्या 179 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेही तितक्याच धावा केल्या आणि समान टाय झाला आणि सुपर ओव्हर खेळण्यात आली. यामध्ये किवी संघाने पहिले फलंदाजी केली आणि 17 धावा केल्या. तर भारतासाठी रोहित शर्माने अखेरच्या चेंडूवर षटकार मारत लक्ष्य पूर्ण केले. रोहितने 15 आणि राहुलने 5 धावा केल्या. 

29 Jan, 21:30 (IST)

भारत-न्यूझीलंड तिसरा टी-20 सामना टाय झाला. भारताने दिलेल्या 179 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने तितक्याच धावा केल्या. 

29 Jan, 21:04 (IST)

न्यूझीलंडच्या संघाने भारताने दिलेल्या 180 धावांच्या प्रत्युत्तरात 15 षटकांच्या अखेरनंतर तीन गडी गमावून 128 धावा केल्या आहेत. विजयासाठी अद्याप संघाला 30 चेंडूंत 52 धावांची गरज आहे.

29 Jan, 20:48 (IST)

भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलने किवी फलंदाज मिशेल सॅटनरला 9 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद करून टीम इंडियाला तिसरे यश मिळवून दिले.

29 Jan, 20:25 (IST)

रवींद्र जडेजाने भारताला दुसरे यश मिळवून दिले. जडेजाने किवी दुसरा सलामी फलंदाज कॉलिन मुनरोला 14 धावांवर आऊट केले. 

29 Jan, 20:22 (IST)

31 20शार्दुल ठाकूर भारताला मोठे यश मिळवून देण्यात यशस्वी झाला. ठाकूरने मतीन गप्टिलला संजू सॅमसनकडे झेलबाद केले. ठाकूरच्या शॉर्ट बॉलवर गप्टिलने जोरदार फटका मारला आणि सॅमसनने झेल टिपला. गप्टिलने 31 धावांची खेळी केली.

29 Jan, 20:08 (IST)

टीम इंडियाने पहिले फलंदाजी करत दिलेल्या 180 धावांच्या प्रत्युत्तरात किवीची सलामी जोडी मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुनरो यांनी चांगली सुरुवात केली आहे. दोन्ही फलंदाज भारतीय गोलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. 4 ओव्हरनंतर गप्टिल 22 आणि मुनरो 11 धावा करून खेळत आहे. 

29 Jan, 19:30 (IST)

भारतीय संघाविरुद्ध 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेच्या या तिसर्‍या सामन्यात यजमान न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा स्थितीत टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 बाद 179 धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर 180 धावांचे आव्हान ठेवला. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी टीमसाठी चांगली सुरुवात केली. रोहितने सर्वाधिक 65 धावा केल्या, तर मनीष पांडे 14 आणि रवींद्र जडेजा 10 धावा करून नाबाद परतले. 

29 Jan, 18:59 (IST)

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने तीन विकेट गमावून 12.1 षटकांत 100 धावा पूर्ण केल्या. कर्णधार विराट कोहली 2 आणि श्रेयस अय्यर संघासाठी 1 धावा करुन खेळत आहेत.

29 Jan, 18:54 (IST)

किवी गोलंदाज हमीश बेनेटने टीम इंडियाला एकाच ओव्हरमध्ये दोन धक्के दिले. 11 व्या ओव्हरच्या चौथ्या ओव्हरवर रोहित शर्मा आणि सहाव्या चेंडूवर त्याने शिवम दुबेला माघारी धाडले. रोहितने 65 आणि शिवमने 3 धावा केल्या. 

29 Jan, 18:50 (IST)

न्यूझीलंडसाठी 10 वा षटक वेगवान गोलंदाज स्कॉट कुगलेजिनने फेकला. स्कॉट कुग्गेलैनच्या या षटकात भारतीय फलंदाजांनी दोन एकेरी आणि लेग बायच्या सहाय्याने एकूण तीन धावा फटकावल्या. 10 षटकांनंतर संघाची धावसंख्या 92/1 आहे. रोहित शर्मा 64 आणि शिवम दुबे संघाकडून 0 धावा करुन खेळत आहेत.

29 Jan, 18:30 (IST)

हॅमिल्टन सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाच्या डावाचे पहिले 6 ओव्हर (पॉवर-प्ले) संपला आहे. सहाव्या ओव्हरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्मा ने हमीश बेनेट च्या चेंडूवर सलग दोन षटकार मारले. या दरम्यान भारताने एकही विकेट न गमावता 69 धावा केल्या. रोहितने 23 चेंडूत अर्धशतकप पूर्ण केले. रोहितने 5 चौकार आणि 3 षटकार मारत हा टप्पा गाठला. रोहित शर्मा 50 आणि केएल राहुल 19 धावा करून खेळत आहे. 

29 Jan, 18:08 (IST)

टीम साऊथीच्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर चौकारांसह रोहित शर्माने भारताचे खाते उघडले. त्याने डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने एक जोरदार शॉट मोर्ल आणि चेंडू सीमारेषेच्या पार पाठवला. पहिल्या ओव्हरनंतर रोहित 4 आणि केएल राहुल 0 धावा करून खेळत आहे. 

29 Jan, 17:33 (IST)

हॅमिल्टनच्या सेडन पार्क मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेचा तिसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी किवी कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 


भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना बुधवारी हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्क (Seddan Park) येथे खेळला जाईल. हा सामना बुधवार, 29 जानेवारी रोजी रात्री 12:30 वाजता खेळला जाईल. तिसरा टी-20 सामना जिंकल्यास न्यूझीलंडच्या भूमीवर टीम इंडिया इतिहास रचेल. या सामन्यात विजयासह भारत न्यूझीलंडच्या भूमीवर किवीविरुद्ध द्विपक्षीय टी-20 मालिका जिंकण्याची भारताची पहिलीच वेळ असेल. न्यूझीलंडमध्ये खेळत टीम इंडिया आजवर एकही द्विपक्षीय टी-20 मालिका जिंकू शकला नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात यापूर्वी फक्त दोन द्विपक्षीय टी-20 मालिका खेळल्या गेल्या आहेत. या दोन्हीमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, पहिला विजय नोंदविण्याचा यजमान किवी संघाचा मानस असेल. सध्याच्या टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 6 विकेट्सने पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात 7 विकेटने पराभूत करत 2-0 ने आघाडी घेतली. तिसरा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक सामना असल्याने रोमांचक होईल अशी अपेक्षा आहे. हा सामन्यातील विजयी संघ मालिका जिंकेल. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

हॅमिल्टनच्या या मैदानावर आतापर्यंत 11 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत. न्यूझीलंडने अखेरच्या सामन्यात 20 षटकांत 4 विकेट्स गमावून 212 धावा फटकावल्या आणि येथे त्यांनी भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी केली होती. तसेच ही या मैदानावरची सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताचा हा संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि 2019 विश्वचषकानंतर त्यांनी खेळलेल्या पाचही टी-20 मालिकेत प्रभावी खेळ केला आहे.

असा आहे भारत न्यूझीलंड संघ

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुग्गेलैन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रैंडहोम, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनर, टिम सेफर्ट (विकेटकीपर), हमीश बेनेट, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us