IND vs WI 5th T20I Live Score Update: पावसामुळे खेळ थांबला, टीम इंडियाचे लक्ष मोठ्या धावसंख्येकडे
T20I मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना आज सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळला जात आहे.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील T20I मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना आज सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळला जात आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने चौथ्या T20I सामन्यात दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिज संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडियासाठी हा सामना करा किंवा मरोपेक्षा कमी नाही. कारण आज भारतीय संघ हरला तर पाच सामन्यांची मालिका गमावेल. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादवने 38 चेंडूत टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 15 वे अर्धशतक झळकावले. त्याने अल्झारी जोसेफच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. पावसामुळे 16व्या षटकात खेळ थांबवण्यात आला. 16व्या षटकातील पाच चेंडू टाकले होते. पावसामुळे खेळ थांबला तोपर्यंत भारताने 15.5 षटकांत चार गडी गमावून 121 धावा केल्या होत्या.