विजयसिंह मोहिते पाटील 'भाजपा' च्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात?
यंदा महाराष्ट्रात चार टप्प्यामध्ये मतदान होणार आहे.
रणजितसिंह मोहिते पाटीलांनी (Ranjitsinh Mohite-Patil )भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आता विजयसिंह मोहिते (Vijaysinh Mohite-Patil ) पाटील काय करणार? हा प्रश्न अनेकांच्या मनात होता. अजूनही भारतीय जनता पक्षाने माढाचा (Madha) उमेदवार जाहीर केलेला नाही. आज विजयसिंह मोहिते पाटील यांनी बोलताना भाजपाच्या तिकीटावर माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्या बाबतचे संकेत दिले आहेत अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता रणजित सिंह की विजयसिंह मोहिते पाटील नेमकं कोणाला तिकीट जाहीर होणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.Ajit Pawar: मोहिते-पाटील यांचा फोन स्विच ऑफ होता, राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणूक तिकीट त्यांनाच तर देणार होते
मोहिते पाटील कुटुंबातील सदस्याला तिकीट मिळत नाही असं चित्र समोर उभं राहिल्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाने म्हणजे रणजित सिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे. रणजितसिंहच्या भाजपाप्रवेशाला विजयसिंहांचा पाठिंबा आहे. माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाने संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. Lok Sabha Election 2019: रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
माढा लोकसभा मतदार संघामध्ये 23 एप्रिल 2019 दिवशी मतदान आहे. यंदा महाराष्ट्रात चार टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. माढा जिंकायचा असेल तर मोहिते पाटील घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी द्या असे कार्यकर्त्यांचे मत आहे. मुख्यमंत्री जर विजयसिंह मोहिते पाटील यांचं मन वळवण्यात यशस्वी ठरले तर त्यांना भाजपाकडून खासदारकीचं तिकीट मिळू शकतं. सध्या विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे माढा मतदार संघाचे खासदार आहेत.