Pune news: गणेशोत्सवाच्या दिवशी साडी नेसू न दिल्याने मुलीची आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना

साडी नेसू न दिल्याने एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे,

Pune news: गणेशोत्सवाच्या दिवशी साडी नेसू न दिल्याने मुलीची आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना
Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Pune news: गणेशोत्सव दिवशी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली. साडी नेसू न दिल्याने एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. देहू रोड परिसरातील शिवाजी विद्यालयात ती इयत्ता सातवीत शिकत होती. तीला गणेशउत्सवा दरम्यान साडी नेसायची होती परंतु तीच्या आईने तीला साडी साठी नकार दिला. या गोष्टीचा राग मनात धरात तीनं आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. देशात संपुर्ण गणेशोत्स साजरा केला जात आहे आणि एकीकडे पुण्यात अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुष्मिता प्रधान (13) असं या आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे, तीच्या आईने साडी नेसण्यास मनाई केली. या गोष्टीचा राग धरत ती बाथरुम मध्ये रडत गेली. काही काळ तीनं स्वत: ला कोंडून ठेवलं. तीच्या बहिणीने काही वेळा नंतर बाथरुमचा दरवाजा वाजवला. परंतु काही प्रतिसाद येत नव्हता यामुळे घरातील सर्व सदस्य घाबरले. बाथरूमच्या दरवाजा तोडून जाण्यास प्रयत्न करू लागले. अखेर बाथरूमचा दरवाजा तोडला. मुलगी गळात स्कार्फ बांधून लटकलेल्या अवस्थेत सापडली.

हे पाहून सर्वांनी आक्रोश केला. शेजारच्यांनी पोलीसांत या घटनेची माहिती दिली, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतला. मृतदेह ताब्यात घेवून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली, या घटनेअंतर्गत अद्याप कोणालाही अटक केले नाही.

(The above story first appeared on LatestLY on Sep 22, 2023 03:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).