Tejas Thackeray Discovered a New Fish Hiranyakeshi: तेजस ठाकरे यांनी शोधला नवा मासा, नाव ठेवलं 'हिरण्यकेशी
या आधीही तेजस ठाकरे यांनी 11 दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे. यात खेकडा, पाली आणि इतर काही वन्यजीवांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे बंधू तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे राजकारणात न रमता निसर्गात अधिक रमले आहेत. नुकतीच त्यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील (Sahyadri Mountain Range,) अंबोली घाटात (Amboli Ghat,) असलेल्या हिरण्यकश नदीत (Hiranyakeshi River) आढळणारा नवा मासा शोधून काढला आहे. 'हिरण्यकेशी' (Hiranyakeshi) असे या माश्याचे नाव ठेवले आहे. सोनेरी रंगाचे केस असलेली ही नवीच प्रजाती तेजस ठाकरे यांनी शोधली आहे. ठाकरे यांनी शोधलेली या माश्याची ही चौथी प्रजाती आहे. ही या माश्याची 20 वी प्रजाती आहे. तेजस ठाकरे यांनी या आधीही पालींच्या अनेक दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्या आहेत.
'हिरण्यकेशी' म्हणजे काय?
तेजस ठाकरे यांनी शोधलेल्या नव्या माश्याचे नाव 'हिरण्यकेशी' असे ठेवले आहे. हे नाव संस्कृत भाषेतील आहे. संस्कृत भाषेत 'हिरण्यकेशी' या शब्दाचा अर्थ सेनेरी रंगाचे केस असा आहे.
'हिरण्यकेशी' हा मासा शोधताना तेजस ठाकरे यांना अंडर वॉटर फोटोग्राफर शंकर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर प्रवीणराज जयसिन्हा यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. (हेही वाचा, Cnemaspis Magnifica: तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर यांच्यासह चार तरुणांनी शोधली Magnificent Dwarf Gecko नामक नव्या प्रजातिची पाल)
वन्यजीवाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्याची तेजस ठाकरे यांची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही तेजस ठाकरे यांनी 11 दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे. यात खेकडा, पाली आणि इतर काही वन्यजीवांचा समावेश आहे. तेजस ठाकरे यांनी केलेले खेकड्यांविषयीचे संशोधन न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ अंकात प्रसिद्ध झाले आहे. तेजस यांचं खेकड्यांविषयी दुसरेही एक संशोधन प्रसिद्ध झाले होते. यात पश्चिम घाटातील एका खेकड्याचे नाव 'सह्याद्री' या मराठी नावावरुन सह्याद्रियाना' असे ठेवण्यात आले.