Sex Drive & Libido: तुमची कामवासना अर्थातच सेक्स करण्याची इच्छा कमी करू शकतात ही 7 औषधे; घ्या जाणून

म्हणजेच सेक्स करण्याची उर्मी पहिल्यासारखी दिसत नाही. याला अनेकदा संबंधित व्यक्ती घेत असलेली औषधे कारणीभूत असतात. मग ही औषधे (Drugs) म्हणजे एखादा अंमली पदार्थ असो किंवा डॉक्टरांनी दिलेले ते प्रिस्क्रिप्शन असो. हळूहळू परिणाम तर होतो. आज आम्ही अशाच 7 औषधांबद्धल सांगणार आहोत.

Sexual Relationship | Representational Picture (Photo Credits: Pixabay)

कोणत्याही जोडप्यामध्ये लैंगिक संबंध (Sexual Relations) ही त्यांचा एकमेकांप्रति असलेला सहवास अधिक दृढ करण्याचा एक महत्त्वाचा घटक. पण,  बहुतांश जोडप्यांमध्ये एकमेकांप्रति असलेली लैंगिक आकर्षण (Sexual Attraction) अथवा कामवासना (Libido) कमी होत जाते. म्हणजेच सेक्स करण्याची उर्मी पहिल्यासारखी दिसत नाही. याला अनेकदा संबंधित व्यक्ती घेत असलेली औषधे कारणीभूत असतात. मग ही औषधे (Drugs) म्हणजे एखादा अंमली पदार्थ असो किंवा डॉक्टरांनी दिलेले ते प्रिस्क्रिप्शन असो. हळूहळू परिणाम तर होतो. आज आम्ही अशाच 7 औषधांबद्धल सांगणार आहोत. दुर्दैवाने, जी व्यक्तींमधली लैंगिक इच्छाशक्ती (Sexual Desire) कमी करतात.

वेदनाशामक (Painkillers)

फारशी जोखीम नसलेली वेदनाशामक औषधे ( risk-free painkiller) तुमची लैंगिक इच्छाशक्ती मारतात. पेनकिलर हे टेस्टोस्टेरॉन आणि पुरुष आणि स्त्रिया यांच्या लैंगिक पसंतींसाठी महत्त्वाच्या विविध हार्मोन्सचे उत्पादन कमी करण्यासाठी ओळखले जातात. (हेही वाचा, Loud Sex: एखाद्या Pornstars प्रमाणे आवाज काढत सेक्स करत असे जोडपे; वैतागलेल्या शेजाऱ्यांनी दिला 'हा' सल्ला, घ्या जाणून)

अँटी-डिप्रेसंट्स (Anti-depressants)

वेदनाशामन औषधांप्रमाणेच नैराश्येचा त्रास कमी करण्यासाठी देण्यात येणारी औषधेही तुमच्यातील कामवासना कमी करु शकतात. अनेकदा ही औषधे कामेच्छा किलर म्हणूनही ओळखली जातात. सामनान्यत: अँटीडिप्रेसंट-संबंधित लक्षणांमध्ये सेक्समध्ये रस कमी होणे, भावनोत्कटतेला उशीर होणे, विलंबित स्खलन किंवा कामोत्तेजना नसणे, अजिबात स्खलन न होणे आणि पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन यांचा समावेश होतो.

गर्भ निरोधक गोळ्या (Birth Control Pills)

अनेक महिला गर्भनिरोधक गोळ्या अथवा बाहेरुन शरीरात बसवलेली साधनेही तुमच्यातील लैंगिक संप्रेरकांचे स्तर कमी करू शकतात जे कामवासना आणि लैंगिक इच्छांवर परिणाम करतात. त्यामुळे लैंगिक जीवनासाठी गर्भनिरोधक गोळ्या कमी उपयोगी पडतात.

स्टॅटिन आणि फायब्रेट्स (Statins and Fibrates)

उच्च कोलेस्टेरॉलवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधेही तुमच्या लैंगिक कामेच्छा मारु शकतात. खास करुन टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन आणि इतर लैंगिक संप्रेरकांच्या निर्मितीमध्ये व्यत्यय आणू शकतात. स्टॅटिन्स आणि फायब्रेट्सच्या दुष्परिणामांच्या काही अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला आहे की दोन्ही प्रकारच्या औषधांमुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते.

बेंझोडायझेपाइन्स (Benzodiazepines-Tranquilizers)

चिंता, निद्रानाश आणि स्नायूंच्या दुखण्यावर वापरली जाणारी औषधेही कामवासना म्हणजेच लैंगिक इच्छा कमी करते.बें झोडायझेपाइन्सचे शामक गुणधर्म लैंगिक स्वारस्य, उत्तेजना आणि संवेदना प्रभावित करतात. ज्यामुळे संभागात अडथळा, लिंगात पुरेशी ताठरतना न येणे. वेदनादायक संभोग, स्खलन समस्या यांसारखे दुष्परिणाम दाखवते.

ब्लड प्रेशर औषधे (Blood Pressure Medications)

उच्च रक्तदाबावर देण्यात येणारी औषधेही लैंगिक इच्छाशक्तीचे दमन करतात. ही औषधे अधिक प्रमाणावर घेणाऱ्या लोकांना प्रामुख्याने हा त्रास अधिक जाणवू शकतो.

अँटीहिस्टामाइन्स (Antihistamines)

ऍलर्जी-संबंधित लक्षणे नियंत्रित करण्यासाठी वापरली जाणारी औषधेही तुमच्यातील कामवासना कमी करु शकतात. उदा. सतत शिंका येणे आणि नाक वाहणे हा त्रास एॅलर्जीमुळे होतो. अशा वेळी ही घेतल्या जाणाऱ्या औषधांचा अतिरेक झाल्यास पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन किंवा स्खलन समस्या, तर महिलांना योनीमार्गात कोरडेपणाचा सामना करावा लागतो