Toor (Arhar) Dal Health Benefits: वजन कमी करण्यापासून , पाचनक्रिया सुधरण्यापर्यंत 'हे' आहेत तूर डाळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे
ही डाळ खाल्ल्याने आपल्या शरीराला पुष्कळ पोषकद्रव्ये मिळतात. यात प्रोटीन, फॅट्स, कार्बोहाइड्रेट्सअशी पोषसक तत्वे असतात. तसेच ही फायबरचा उत्तम स्रोत आहे आणि कोलेस्टेरॉल मुक्त आहे. आज आपण जाणून घेऊयात या डाळीचे काही महत्वाचे फायदे.
स्वयंपाक घरात असलेल्या डाळीबद्दल बोलायचे झाले तर सर्वात आधी आपल्यासमोर पिवळी डाळ म्हणजे तूर डाळ येते. या डाळीला अरहर असेही म्हणतात. ही डाळ प्रत्येकाच्या घरी बनवली जातेच. फक्त चवीला छान आहे म्हणून नाही तर या डाळीचे खुप फायदे ही आहेत. ही डाळ खाल्ल्याने आपल्या शरीराला पुष्कळ पोषकद्रव्ये मिळतात. यात प्रोटीन, फॅट्स, कार्बोहाइड्रेट्सअशी पोषसक तत्वे असतात. तसेच ही फायबरचा उत्तम स्रोत आहे आणि कोलेस्टेरॉल मुक्त आहे. आज आपण जाणून घेऊयात या डाळीचे काही महत्वाचे फायदे. (Winter Skin Care Tips: थंडीत अंगाला सुटणारी खाज कमी करण्यासाठी काय कराल?, जाणून घ्या काही सोप्प्या घरगुती टिप्स )
वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी
तुरीची डाळ सेवन करणे वजन नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. तुरीच्या डाळीत पोषक घटकांचे प्रमाण अधिक असतेच शिवाय उष्मांकांचे प्रमाणही कमी असत. त्याव्यतिरिक्त कोलेस्ट्रॉल, सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅट चे प्रमाण देखील कमी असते. या डाळीचे सेवन केल्याने उर्जा मिळते आणि व्यक्ती दिवसभर उत्साही राहातो.
हृदयाच्या आरोग्यासाठी
हृदयाच्या आरोग्यासाठी तुरीच्या डाळीचे सेवन करणे नक्कीच फायदेशीर असते. त्यात पोटॅशिअम असते त्यामुळे रक्तदाब नियमित राहाण्यास मदत होते. पोटॅशिअम रक्तवाहिन्या चांगल्या ठेवण्याबरोबरच पेशींचा शरीरभर पसरण्यासही मदत होते. शरीराचा रक्तदाब योग्य राहातो आणि हृदयविकाराशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.
पाचनक्रिया सुधारते
अरहर डाळमध्येही इतर शेंगांप्रमाणे फायबरची मात्रा चांगली असते, जी पचनसाठी चांगली मानली जाते. मलशी संबंधित समस्येवर मात करण्यासाठी फायबर-समृद्ध आहाराचा वापर केला जाऊ शकतो. तुरीची डाळ फायबर पचन सुलभतेसह आपली भूक नियंत्रित करण्यास मदत करते.त्यामध्ये असलेले पोषक आपल्या शरीरातील चरबी आवश्यक उर्जेमध्ये बदलण्यात मदत करतात.
.इम्युनिटी बुस्टर
तुरीच्या डाळीमुळे सी जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढते. कच्चे तुरीचे दाणे चावून खाल्ल्यास सी जीवनसत्त्वाची पूर्तता केली जाते. तुरीची डाळ शिजवल्यानंतर त्यात सी जीवनसत्त्व केवळ 25 टक्केच राहाते. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची असेल तर तुरीची कच्ची डाळ खाणे अधिक उत्तम.