Health Tip: तिखट खाताना अशक्तपणा का जाणवतो?
आपले वाडवडिलांनी सांगितले आहेच "अती तेथे माती व थोड्यात गोडी." याचाच अर्थ असा कोणतीही गोष्ट आपल्याला झेपेल इतपत केली तर त्रास होत नाही.मसालेदार, चमचमीत पदार्थ वारंवार खाण्यात आल्यावर शरीरास अपायकारक असते.
Health Tip: आपले वाडवडिलांनी सांगितले आहेच "अती तेथे माती व थोड्यात गोडी." याचाच अर्थ असा कोणतीही गोष्ट आपल्याला झेपेल इतपत केली तर त्रास होत नाही.मसालेदार, चमचमीत पदार्थ वारंवार खाण्यात आल्यावर शरीरास अपायकारक असते.आपण उष्ण कटिबंधीय प्रदेशात राहतो.उष्ण हवामानामुळे शरीरास आणखी उष्ण पदार्थ खाण्याची फारशी गरज नसते. जे लोक भरपूर कष्ट करतात ते तिखट खाउ शकतात. बाकीच्यांना तशी गरज नसते. आपण बरेच जण झणझणीत चमचमीत खायचे म्हणून खातो. तेव्हा असे पदार्थ खाताना तारतम्य बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
तिखट खाताना अशक्तपणा जाणवतो याचाच अर्थ असा आहे कि आपली पचनशक्ती कमी झाली आहे. तिखटामुले आपल्या जठराची अंतरतवचा नाजूक झाल्याने तिचा दाह होत असेल. त्यामुळे आपणास अशक्तपणा जाणवत असेल. वेळीच सावध न झाल्यास आपणास पित्ताचा त्रास होऊ शकतो. पुढील पायरी म्हणजे अल्सर (जठराच्या अंतरतवचेला जखमा होणे.)होऊ शकतो.तरी आपण याबाबत वैद्यकीय सल्ल्यानुसार वागणे उचित ठरेल.(Genes सांगू शकतात चिंता आतड्यांच्या विकाराशी का संबंधित आहे, संशोधन अहवाल)
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)