Rabindranath Tagore Jayanti 2020 Quotes: रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी, खास मराठी HD Greetings, Wallpapers, Whatsapp Status च्या माध्यमातून शेअर करा त्यांचे अनमोल विचार
7 मे, 1861 रोजी कोलकात्याच्या जोराशंका ठा़कूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला
Rabindranath Tagore Jayanti 2020 Marathi Quotes: जगप्रसिद्ध भारतीय कवी, शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वचिंतक, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, संगीतकार अशा अनेक प्रांतात ठसा उमटवणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांची आज जयंती. 7 मे, 1861 रोजी कोलकात्याच्या जोराशंका ठा़कूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला. एका सधन आणि सुसंकृत घरात जन्म झाल्याने रवींद्रनाथ यांचे बालपण अतिशय उत्तमरित्या व्यतीत झाले. आपल्या वाढीच्या काळात त्यांनी भारतभ्रमण केले, अनेक पुस्तके वाचली, कित्येक लोकांची भेट घेतली. 1877 सालच्या रचनांमुळे ते पहिल्यांदा प्रकाशझोतात आले. पुढे शांतीनिकेतनची स्थापना, उत्तम बंगाली साहित्याची निर्मिती, संगीताला वाहिलेले जीवन, व उतारवयात चित्रकलेची निर्माण झालेली आवड असे समृद्ध जीवन रवींद्रनाथ यांना लाभले.
‘गीतांजली’ला मिळालेल्या नोबेल पारितोषिकामुळे ते ‘विश्ववंद्य कवी’ ठरले, तर त्यांच्या ‘जन गण मन’ला राष्ट्रगीताचा मान मिळाल्याने ते राष्ट्रकवी झाले. ‘साधना’, ‘भारती’, ‘वंगदर्शन’ अशा मासिकांचे त्यांनी संपादनही केले. यंदा रवींद्रनाथ टागोर यांची 159 वी जयंती साजरी केली जात आहे. या खास प्रसंगी आपण रवींद्रनाथ टागोर यांचे अमूल्य विचार, WhatsApp Messages, Images, WhatsApp, Facebook, Twitter, Instagram च्या माध्यमातून शेअर करून आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देऊ शकता.
Rabindranath Tagore Quotes -
आयुष्यातून सूर्य प्रकाश निघून गेला म्हणून जर तुम्ही रडत बसाल, तर तुमच्या अश्रुंमुळे तुम्ही रात्रीचे मोहक चांदणेही पाहू शकणार नाही- रवींद्रनाथ टागोर
फुलाने काट्यांचा द्वेष करू नये, फूल एकच आहे पण काट्यांची संख्या अधिक आहे- रवींद्रनाथ टागोर
भांड्यात ठेवलेले पाणी चमकते, समुद्राचे पाणी अस्पष्ट दिसते तसेच लघु सत्य स्पष्ट शब्दात मांडता येऊ शकते परंतु महान सत्य नेहमी मौन राहते- रवींद्रनाथ टागोर
आनंदी राहणे खूप सोपे असते, मात्र साधेपणा अंगिकारणे कठीण- रवींद्रनाथ टागोर
महिलांच्या स्वभावातील सर्वात मोठे बदल प्रेमाद्वारे घडवून आणले जाऊ शकतात, तर पुरुषांमधील महत्वाकांक्षेने- रवींद्रनाथ टागोर
फुलांच्या पाकळ्या तोडून तुम्ही त्याचे सौंदर्य गोळा करू शकत नाही- रवींद्रनाथ टागोर
दरम्यान, रवींद्रनाथांनी रचलेल्या व चाल दिलेल्या जवळपास 2230 गीतांना एकत्रितपणे रवींद्रसंगीत असे संबोधले जाते. त्यावेळी भारतामध्ये सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख केन्द्रांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभाव रवींद्रनाथांवरही पडला होता. संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत. 13 नोव्हेंबर, 1913 रोजी त्यांच्या गीतांजलि या काव्यसंग्रहाला स्वीडिश अकॅडेमीने नोबेल पारितोषिक दिल्याची वार्ता कळली. साहित्यासाठी हे पारितोषिक मिळवलेले रवींद्रनाथ पहिले आशियाई लेखक होत.