Maharashtra Din 2019: 59 व्या महाराष्ट्र दिन निमित्त जाणून  घ्या  महाराष्ट्र राज्याबद्दल ‘5’ गौरवास्पद गोष्टी

‘अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा’ म्हणायला भाग पडतील अशी आहेत महाराष्ट्राविषयी 5 खास वैशिष्ट्य

Maharashtra Day ।(Photo Credits: PIB)

1 मे हा दिवस जगात आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Workers' Day) तर महाराष्ट्रात कामगार दिनासोबतच महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 दिवशी ब्रिटिश राजमधील ‘बॉम्बे’ प्रेसिडन्सी म्हणजे आजचा गुजरात (Gujrat) आणि महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेश यांची भाषावार प्रांतरचनेनुसार दोन विविध आणि स्वतंत्र राज्यांमध्ये विभागणी झाली. 107 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह  स्वतंत्र महाराष्ट्र अस्तित्त्वात आला. यंदा  महाराष्ट्रात 59  वा महाराष्ट्र दिन  साजरा केला जात. कला, राजकारण,  खेळ, संगीत अशा सार्‍याच क्षेत्रात महाराष्ट्र आणि मराठी माणूस अग्रेसर आहे. मग  आजच्या दिवशी  तुमची छाती अभिमानाने थोडी अधिक फुलून येईल अशा या ‘5’ खास  गोष्टी नक्की जाणून  घ्या. Happy Maharashtra Day 2019: 'महाराष्ट्र दिना'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास इंग्रजी-मराठी SMS, Wishes, Quotes, Images, GIFs आणि शुभेच्छापत्रं!

‘अभिमान आहे  मला  मी  मराठी असल्याचा’ म्हणायला भाग  पडतील अशी 5  वैशिष्ट्य

1.ऐतिहासिक  वारसा

महाराष्ट्र प्राचीन  काळापासून ऐतिहासिक वारसा  जपण्यास अग्रेसर ठरला  आहे.  महाराष्ट्राचं दैवत  छत्रपती शिवाजी महाराज आहे. या  जाणत्या राजाने महाराष्ट्राला अनेक अभिमानास्पद गोष्टी दिल्या. त्यापैकी एक म्हणजे गड किल्ले. महाराष्ट्र  हे भारतातील एकमेव असं  राज्य  आहे  जेथे  सुमारे 60 किल्ले आहेत.

2.सागरी किनारा

महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी  किनारा लाभला आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या महराष्ट्रात  गणपतीपुळे, काशिद, देवबाग,  तारकर्ली यासारखे सुरेख किनारे आता परदेशी नागरिकांनाही भूरळ पाडणारी पर्यटन स्थळं बनत आहेत.

3.मराठी भाषा

महाराष्ट्राची  ओळख  असलेली स्थानिक  भाषा म्हणजे मराठी. दर्जेदार साहित्य आणि कला, संगीत यामुळे मराठी भाषा ऐश्वर्यसंपन्न झाली आहे. देशा-परदेशात त्याची कीर्ती पोहचली आहे. देशात सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या भाषेमध्ये मराठी चौथ्या स्थानी आहे. सुमारे 7.2 कोटी  लोकं ही  भाषा  बोलतात. मराठी भाषेचं सौंदर्य अधिक खुलवतात महाराष्ट्रातील या '14' मजेशीर बोली भाषा

4.बॉलिवूड नगरी

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी ‘सिनेमा’ भारतामध्ये  आणला. मराठमोळे फाळके यांनी बनवलेला ‘ राजा  हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय सिनेमा आहे. आज मुंबईत ‘बॉलिवूड’ विसावले आहे. आज  फक्त भारतीय सिनेमामधून सुमारे 25  बिलियन डॉलरची  उलाढाल कराणारा  एक व्यवसाय आहे. उद्योग निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे.

5. खवय्येगिरी

जगातील सार्‍या शाकाहारी  नाश्त्याच्या पदर्थांवर  मात  करून मुंबईतील  ‘आस्वाद’ची मिसळ  अव्वल ठरली  आहे. 2015 साली लंडन मधील Foodie Hub Global Awards ने तिचा गौरव करण्यात आला. मिसळी सोबतच पुरण पोळी, उकडीचे मोदक ते अनेक मसालेदार शाकाहारी, मांसाहारी पदार्थ आवडीने  बनवले  आणि चाखले जातात. मुंबईत या '6' ठिकाणी मिळणारी चविष्ट मिसळ, चाखायलाच हवी !

महाराष्ट्राने आणि अनेक मराठमोळ्या व्यक्तिमत्त्वांनी गौरवास्पद कामगिरी केली आहे. त्यामुळे आता हा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचवून तो जपण्याचे संस्कार देणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे.