Gatari Amavasya 2019: महाराष्ट्रात श्रावण सुरू होण्याआधी कधी पर्यंत साजरी करू शकाल 'गटारी'?

यंदा ही गटारी अमावस्या (Gatari Amavasya) 31 जुलै दिवशी साजरी केली जाणार आहे.

Gatari 2019 (File Photo)

Gatari Amavasya 2019 Dates: गटारी अमावस्या हा श्रावण महिना (Shravan Month) पाळणार्‍या मांसाहार्‍यांसाठी मह्त्त्वाचा दिवस आहे. यंदा ही गटारी अमावस्या (Gatari Amavasya) 31 जुलै दिवशी साजरी केली जाणार आहे. श्रावण महिना हा हिंदू महिन्यांमधील पवित्र महिना मानला जातो. अनेक व्रत वैकल्यांची रेल चेल या महिन्यात असल्याने श्रावण महिन्यात मांसाहार टाळला जातो. त्यामुळे पुढील किमान 25-30 दिवस मांसाहार खाणं निषिद्ध असल्याने गटारी अमावस्या म्हणजेच आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी मांसाहारावर मनसोक्त ताव मारण्याकडे अनेकांचा कल असतो. Gatari Amavasya 2019 Jokes & Memes: गटारीच्या शुभेच्छा मजेशीर Wishes, WhatsApp Messages and Status च्या माध्यमातून देण्यासाठी खास शुभेच्छापत्र

आषाढी अमवस्या ही गटारी अमावस्या म्हणून साजरी केली जात असली तरीही या अमावस्येला दीप अमावस्या म्हणून ओळखलं जातं. या दिवशी दिव्यांची आरास करण्याचीही पद्धत आहे. पण श्रावणापासून पुढे व्रत वैकल्यांचा काळ सुरू असल्याने तुम्हांला मांसाहार खाता येणार नसेल तर यंदा 31 जुलै दिवशीच तुम्हांला मांसाहार खाण्याची तुमचीहौस पुरवून घ्यावी लागणार आहे. आजकाल गटारी अमावस्या हा दिवसही सेलिब्रेशन म्हणून साजरा केला जातो. मांसाहारासोबत मद्यपान करून मित्रमंडळींसोबत आनंद लुटला जातो. मग तुम्हीही असा प्लॅन करत असाल तर चिकनचे हे विविध चमचमीत पदार्थ बनवून यंदाची गटारी साजरी करा. त्यामध्येहीआषाढ महिन्यातला शेवटचा रविवार 28 जुलै या दिवशी मित्रमंडळी आणि कुटूंबासोबत विकेंड ट्रीप प्लॅन करत असाल तर ही पहा मुंबई नजिकची काही मस्त फार्म हाऊस  (नक्की वाचा:  Deep Amavasya 2019: दीप अमावस्या का आणि कशी साजरी करतात?)

आषाढी अमावस्या मुहूर्त

आषाढी अमावस्या 31 जुलै दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून 1 ऑगस्टच्या सकाळी 8.42 मिनिटांपर्यंत आहे.

यंदा श्रावण महिना 30 ऑगस्टला संपणार आहे. त्यानंतर लगेच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यामुळे अनेक घरात सुमारे दीड दोन महिन्यांनंतर मांसाहाराचा बेत रंग़णार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif