Diwali 2018 : धनतेरस दिवशी मुंबई,पुणे ठिकाणी सोनं, चांदीचा नेमका दर काय ?

तसेच आज यमदीपदान करण्याचीही प्रथा आहे.

सोन्याचा भाव Photo Credits Pixabay

धनतेरसच्या (धनत्रयोदशी ) दिवसापासून महाराष्ट्रासह देशभरात विविध स्वरूपामध्ये दिवाळी साजरी करायला सुरूवात होते. या दिवशी पूजाविधीसोबतच सोन्या,चांदीचे दागिने विकत घेण्याची प्रथा आहे. आजपासून लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा या दिवशी प्रत्येकजण आपल्या कुवतीप्रमाणे एखादा दागिना किंवा कोणत्याही स्वरूपातील सोनं-चांदी विकत घेतात. पण जागतिक बाजारात अमेरिकन डॉलरसमोर कमजोर होणारा रूपया पाहता शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम सोन्यावरही झाला आहे.  Diwali 2018 धनतेरस विशेष : नरेंद्र मोदी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेतील सोन्या, चांदीच्या वीटा विक्रीला !

धनतेरसच्या दिवशी यंदा सोन्याचा सर्वाधिक दर कोलकत्त्यामध्ये आहे तर सगळ्यात स्वस्त सोनं आज केरळमध्ये उपलब्ध आहे. मुंबईतील सोनं बाजारभावानुसार 24 कॅरेट सोनं 32,726, 22 कॅरेट सोनं 31,166 रूपायांमध्ये विकत घेता येईल तर पुण्यातील सराफ बाजरात 24 कॅरेट सोन्याचा दर 32,708 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 31,168 रूपये इतका आहे. सर्वात स्वस्त केरळमध्ये सोन्याचा दर 31,000 रूपये 24 कॅरेटसाठी इतका आहे.

सोन्याप्रमाणेच काहीजण चांदीची देखील एखादी वस्तू विकत घेतात. आज मुंबईत चांदीचा दर 41,000 प्रतिकिलो इतका आहे. सोन्यच्या दुकानात तुम्हांला दागिने किंवा इतर स्वरूपात सोनं, चांदी विकत घेतल्यास त्यावर 3% जीएसटी, घडणावळ देऊन वस्तू विकत घ्यावी लागते. त्यामुळे प्रत्येक दुकानात वेगवेगळ्या दरात आज सोनं खरेदी केलं जाईल. यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदीची वस्तू विकत घेण्याची शुभ वेळ कोणती?

धनतेरसच्या दिवशी धनाच्या पूजेसोबतच आरोग्याची देवता असलेल्या धन्वंतरीचीदेखील पूजा केली जाते. तसेच आज यमदीपदान करण्याचीही प्रथा आहे. त्यामागील नेमकं कारण काय? हे जाणून घ्या आणि यंदा उत्साहात धनतेरसचा सण साजरा करा.  धनतेरसच्या दिवशी 'या' 4 वस्तूंची खरेदी कराल तर घरात पसरेल सुख, समुद्धी आणि पैसा !

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif