Medical Oxygen Shortage: 'या' राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनची सर्वाधिक कमतरता; वाहतुकीमध्ये का येत आहे अडथळा? जाणून घ्या
मात्र, बर्याच राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता आहे. अशा परिस्थितीत त्याच्या वाहतुकीची मागणी निर्माण झाली, परंतु त्यात बर्याच तांत्रिक अडचणी येत आहेत.
Medical Oxygen Shortage: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अनेक राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्णांसाठी बेड शिल्लक नाहीत. तसेच अनेक रुग्णालयात मेडीकल ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. सध्या देशात परिस्थिती इतकी वाईट आहे की, रूग्णांवर रस्त्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय ऑक्सिजनअभावी बर्याच लोकांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्कालीन बैठक घेतली. ज्यामध्ये 50 हजार मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजन आयात करण्याची योजना आखली गेली. देशात कोणत्या राज्यांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची कमतरता आहे? ऑक्सिजनची वाहतूक करणं का कठीण आहे? हे जाणून घेऊयात...
'या' राज्यात ऑक्सिजनच्या पुरवठ्याची कमतरता -
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांत ऑक्सिजनची कमतरता आहे. महाराष्ट्रात वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी राज्यातील एकूण ऑक्सिजन उत्पादन क्षमतेपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने बर्याच लोकांचा मृत्यू झाला आहे. (वाचा -
ऑक्सिजन वाहतूक सुलभ का नाही?
देशातील बहुतेक राज्ये ऑक्सिजनची निर्मिती करतात. मात्र, बर्याच राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता आहे. अशा परिस्थितीत त्याच्या वाहतुकीची मागणी निर्माण झाली, परंतु त्यात बर्याच तांत्रिक अडचणी येत आहेत. माहितीनुसार, वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 24 तास आणि सात दिवस रस्ता वाहतुकीची खात्री करण्यासाठी पुरेसे क्रायोजेनिक टँकर नाहीत. अशा परिस्थितीत जेव्हा ऑक्सिजन एका राज्यातून दुसर्या राज्यात जात असेल तेव्हा त्याच्या उत्पादकाकडून रुग्णाला पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी तीन ते पाच दिवसांऐवजी सहा ते आठ दिवस लागतो.
ऑक्सिजनचा पुरवठा करणारे म्हणतात की, त्यांच्याकडे पुरेसे ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध करण्यासाठी पुरेसा जंबो आणि ड्युरा सिलिंडर नाहीत. याशिवाय वाहतूक आणि रसद खर्च वाढल्यामुळे सिलिंडर्सची रिफिलिंगही महाग झाली आहे. पूर्वी एका सिलिंडरची रिफिलिंग करण्यासाठी 100 ते 150 रुपये लागत असतं. आता त्याची किंमत 500 वरून दोन हजार रुपयांवर गेली आहे.
रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात साठवण टाक्या बांधल्या जात आहेत. यामुळे कमीत कमी 10 दिवस ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असे रुग्णालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे गेल्या एक वर्षात सिलिंडरची वाट न पाहता अनेक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जंबो टॅंकर तयार केले गेले. विशेष म्हणजे सध्या मध्य प्रदेशात लोह, स्टील आणि काचेच्या उद्योगांसाठी ऑक्सिजन तयार करणार्यांकडून वैद्यकीय ऑक्सिजन तयार केला जात आहे.