Lok Sabha Speaker Election: लोकसभेमध्ये अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच होणार निवडणूक; NDA च्या Om Birla यांच्या विरोधात INDIA Bloc चे K Suresh रिंगणात
एनडीए चे ओम बिर्ला भाजपा खासदार आहेत तर इंडिया ब्लॉक कडून कॉंग्रेसचे के सुरेश यांनी लोकसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल केले आहेत.
लोकसभा निवडणूकीनंतर आता 24 जून पासून 18 व्या लोकसभेच्या संसदीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. लोकसभेमध्ये हंगामी अध्यक्ष पदाच्या वादानंतर लोकसभेच्या अध्यक्ष पदासाठी देखील निवडणूक होणार आहे. आतापर्यंत एकमताने लोकसभा अध्यक्षांची निवड केली जात होती. स्वतंत्र भारताच्या इतिहासात या पदासाठी निवडणूक झालेली नाही. पण 18व्या लोकसभेमध्ये एनडीए कडून ओम बिर्ला (Om Birla0 आणि त्यांच्या विरोधात इंडिया ब्लॉक कडून के सुरेश (K Suresh) यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने पहिल्यांदाच लोकसभेत निवडणूक होणार असल्याचं चित्र आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपा कडे मागील दोन्ही लोकसभेमध्ये बहुमत होते त्यामुळे त्यांच्याकडे अध्यक्ष पद होते आणि उपाध्यक्ष पद रिक्त होते. पण यंदाच्या टर्ममध्ये भाजपा कडे 240 जागा आहेत. बहुमतापासून ते 32 जागा दूर आहेत. मात्र त्यांनी Janata Dal (United) आणि Telugu Desam Party सोबत एकत्र येऊन सरकार बनवलं आहे. दरम्यान विरोधकांमधून राहुल गांधी यांनी, एनडीएच्या लोकसभा अध्यक्षांच्या निवडीला इंडिया ब्लॉक तेव्हाच पाठिंबा देईल, जेव्हा ते उपसभापतीपद विरोधकांना देतील असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र आता कॉंग्रेसने लोकसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत के सुरेश यांना उतरवलं आहे. Aaditya Thackeray On NDA Sarkar: 'सरकार बनताच आश्वासनं आणि पक्ष मोडण्याची भाजपाची जूनी सवय' म्हणत आदित्य ठाकरे यांनी दिला भाजपाच्या मित्रपक्षांना 'हे' पद मिळवण्याचा सल्ला!
लोकसभा अध्यक्ष कसा निवडला जातो?
संविधानाच्या कलम 93 नुसार लोकसभा अध्यक्षांची निवड होते. नव्या लोकसभेमध्ये नवा अध्यक्ष असतो. कामकाज सुरू करण्यासाठी आणि नवा अध्यक्ष निवडेपर्यंत राष्ट्रपतींकडून लोकसभेतील ज्येष्ठ खासदाराची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड होते. त्यांच्या द्वारा खासदारकीची शपथ दिली जाते. आता 18 व्या लोकसभेसाठी 26 जूनला लोकसभा अध्यक्षा पदाची निवडणूक होणार आहे. साध्या बहुमताने लोकसभा अध्यक्ष निवडला जातो, म्हणजे सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांकडून अर्ध्याहून अधिक मते मिळवणारा उमेदवार अध्यक्ष होतो.
सभागृहाचं काम सुरळीत चालवण्याची जबाबदारी अध्यक्षांवर असते. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनाही सांभाळून लोकसभा अध्यक्षांनी तटस्थ राहून कामकाज चालवणं अपेक्षित असतं. अध्यक्ष कोणत्याही मुद्द्यावर स्वतःचं मत जाहीर करत नाहीत. प्रस्तावावरच्या मतदानात अध्यक्ष सहभागी होत नाहीत पण जर प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधात सारखीच मतं पडली पर अध्यक्षांचं मत निर्णायक असतं. सदनात अयोग्य वर्तन केल्यास सदस्याला निलंबित करण्याचा अधिकार देखील लोकसभा अध्यक्षांकडे असतो.
यंदा 18 व्या लोकसभेमध्ये 543 सदस्यांच्या लोकसभेत 293 खासदार असलेल्या एनडीएकडे स्पष्ट बहुमत आहे, तर विरोधी इंडिया ब्लॉक कडे 234 खासदार आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)