IPL Auction 2025 Live

Indian Workforce: प्रत्येक परिस्थितीमध्ये व्यस्थ राहतात भारतामधील कर्मचारी; कामाच्या ठिकाणी जुळवून घेण्याच्या बाबतीत जगात अव्वल- ADP Study

एडीपी रिसर्च इन्स्टिट्यूटने केलेल्या ग्लोबल वर्कप्लेस स्टडी 2020 चा निकाल समोर आला आहे. यामध्ये कर्मचारी व्यस्त राहणे व त्यांच्या कामाच्या ठिकाणी जुळवून घेण्याच्या गोष्टीवर कोरोनाच्या परिणामाबाबत रिसर्च झाला आहे.

Image used for representational purpose. (Photo Credits: PTI)

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी, कामगारांची उपलब्धता असल्याने विदेशातील अनेक कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करण्यास तयार असतात. सर्वसामान्यपणे भारतामधील लोक इतर देशांच्या तुलनेत कमी पैशांवर जास्त काम करतात, म्हणूनही काही कंपन्या इथला कामगारवर्ग निवडतात. आता भारताकडे जगातील सर्वात व्यस्त (Engaged) आणि लवचिक (Resilient) कार्यबल असल्याची गोष्टही सिद्ध झाली आहे. ग्लोबल एचआर आणि पे-रोल (Global HR and Payroll) कंपनी एडीपीने (ADP) जाहीर केलेल्या आकडेवारीवरून हे सांगण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी लवचिकतेच्या बाबतीत भारताने जागतिक स्तरावर अव्वल स्थान प्राप्त केले आहे. जागतिक पातळीवरील सरासरी 17 टक्क्यांच्या तुलनेत इथल्या 32 टक्के कर्मचार्‍यांमध्ये अत्यधिक लवचिकता दिसून आली आहे.

तसेच संपूर्णपणे कामात गुंतलेल्या कर्मचार्‍यांच्या बाबतीत भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. जागतिक स्तरावरील सरासरी 14 टक्क्यांच्या तुलनेत भारतातील सुमारे 20 टक्के कामगार पूर्णपणे व्यस्त आहेत. एडीपी रिसर्च इन्स्टिट्यूटने केलेल्या ग्लोबल वर्कप्लेस स्टडी 2020 चा निकाल समोर आला आहे. यामध्ये कर्मचारी व्यस्त राहणे व त्यांच्या कामाच्या ठिकाणी जुळवून घेण्याच्या गोष्टीवर कोरोनाच्या परिणामाबाबत रिसर्च झाला आहे. यात चीनसह 25 देशांतील 26,000 हून अधिक कामगारांचे सर्वेक्षण केले गेले आहे.

अभ्यासामध्ये, लोकांची व्यस्थ राहण्याची स्थिती ही सकारात्मक असल्याचे वर्णन केले आहे. यासाठी 'जोम, समर्पण आणि शोषण' असे शब्द वापरले आहेत. तर कामाच्या ठिकाणची लवचीकपणा ही एखाद्या व्यक्तीची प्रतिकार करण्याची क्षमता, कामात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करून परत काम करण्याची क्षमता नमूद करते. (हेही वाचा: खोट्या FASTag चा सुळसुळाट; फास्टॅगच्या फसवणुकीबाबत NHAI जारी केला अलर्ट, जाणून घ्या नक्की कुठे खरेदी कराल)

महत्वाचे म्हणजे, संशोधकांना असे आढळले की, स्वत: आजारी पडणे किंवा कुटूंबातील एखादी व्यक्ती आजारी पडणे अशा वैयक्तिक कोविड पॉझिटिव्ह परिस्थितीचा अनुभव असणारे कर्मचारी अत्यंत लवचिकतेने काम करीत होते. या डेटाच्या संशोधनात असे सुचवले आहे की, बर्‍याचदा एखादी दुर्घटना किंवा संकटानंतरही लोक कणखर होऊन कामाला सुरुवात करतात. जगभरातील कर्मचार्‍यांच्या संख्येच्या तुलनेत भारतामध्ये कामगारांच्या संख्येत 20 टक्के वाढ झाली आहे.