COVID-19 Vaccination in India: 2.27 लाखांहून अधिक गरोदर महिलांना कोविड-19 लसीचा पहिला डोस मिळाला- आरोग्य मंत्रालय

देशातील 2.27 लाखांहून अधिक गरोदर महिलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने आज दिली.

Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

देशातील 2.27 लाखांहून अधिक गरोदर महिलांना (Pregnant Women) कोरोना लसीचा (Coronavirus Vaccine) पहिला डोस (First Dose) देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) आज दिली. आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय तज्ञ यांच्याकडून सातत्याने होत असलेले मार्गदर्शन याचा हा परिणाम असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. यापूर्वी गरोदर महिलांच्या लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न, शंका होत्या. या सर्व दूर करुन गरोदर महिलांसाठी लसीकरण मोहिम राबवण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करण्यासाठी मार्गदर्शन सूचना 2 जुलै रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शेअर केली होती. (डिसेंबर 2021 पर्यंत देशातील सर्व प्रौढांचे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न- केंद्र सरकार)

त्यानंतर गरोदर महिलांसाठी लस सुरक्षित असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, हे महिलांसह त्यांच्या कुटुंबियांना पटवून देण्याचं मोठं आव्हान वैद्यकीय आणि आरोग्य कर्चमारी यांच्यावर होतं.  मात्र त्यांच्या प्रयत्नांचं यश आल्याने गरोदर महिलांचा लसीकरणाचा मोठा टप्पा गाठणे शक्य झाले आहे. (COVID-19 Vaccination In Mumbai: गर्भवती महिलांसाठी BMC क्षेत्रात 35 ठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रांची यादी येथे पहा)

या मोहिमेत तामिळनाडू राज्य आघाडीवर असून तेथील 78,838 प्रेग्नेंट महिलांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशातील 34,228, ओडिसा मधील 29,821, मध्य प्रदेश मधील 21,842, केरळमधील 18,423 आणि कर्नाटकातील  16,673 महिलांचा समावेश आहे.

त्याचबरोबर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारकडूनही गरोदर महिलांच्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. तसंच गरोदर महिलांसाठी लसीकरणासाठी विशेष सोय करण्यात आली.

कोविड-19 संसर्गामुळे गर्भवती महिलांचे आरोग्य झपाट्याने बिघडू शकते आणि गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो आणि त्यामुळे गर्भावरही परिणाम होऊ शकतो, असे अभ्यासातून दिसून आले आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी लस घ्यावी, असा सल्ला National Technical Advisory Group on Immunization (NTAGI)  कडून देण्यात आला.

NTAGI च्या सल्ल्याचे स्वागत करत केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांनी गरोदर महिलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. यामुळे गर्भवती महिला आणि गर्भाची सुरक्षितता दोन्ही साधली जाते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif