Central Government On Tur Dal: आयात साठा येईपर्यंत तूर डाळीचा ऑनलाईन लिलाव, केंद्र सरकारचा निर्णय

Tur Dal Buffer Stock: टोमटोचे भाव गगनाला भिडले आहेत. दुसऱ्या बाजूला कडधान्याच्या बाबतीतही अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळू शकते. दरम्यान, केंद्र सरकार सतर्क झाले आहे. त्यामुळे आयात केलेला साठा दाखल होई पर्यंत राष्ट्रीय साठा कोठ्यातून (Buffer Stock) तूर निश्चित आणि अचूक मोजबापासह बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

Pulses | representative pic- (photo credit -pixabay)

Tur Dal Buffer Stock: टोमटोचे भाव गगनाला भिडले आहेत. दुसऱ्या बाजूला कडधान्याच्या बाबतीतही अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळू शकते. दरम्यान, केंद्र सरकार सतर्क झाले आहे. त्यामुळे आयात केलेला साठा दाखल होई पर्यंत राष्ट्रीय साठा कोठ्यातून (Buffer Stock) तूर निश्चित आणि अचूक मोजबापासह बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न मंत्रालयाने याबाबत एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. अन्न मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात मह्टले आहे की, त्यांनी राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) यांना ऑनलाइन लिलावाद्वारे तूर विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले आहे. पात्र मिलर्सना तुरडाळ मिलिंगसाठी उपलब्ध होईल. जेणेकरुन तुटवडा कमी होईल, अशा उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकार बाजारात होणाऱ्या कोणत्याही अन्न पदार्थांचा काळाबाजार अथवा साठेबाजी रोखण्यासाठी विशिष्ट वस्तूंचा साठा करुन ठेवते. त्याला बफर स्टॉक असेही म्हणतात. दरम्यान, वाचकांच्या माहितीसाठी असे की, अन्नधान्याच्या बाबतीत होणारी साठेबाजी, काळाबाजार रोखण्यासाठी आणि ग्राहकांना परवडेल अशा किंमतीत अन्नधान्य मिळण्यासाठी केंद्र सरकारने 2 जून 2023 रोजी जीवनावश्यक वस्तू कायदा, 1955 लागू करून तूर आणि उडीदवर स्टॉक मर्यादा लागू केली होती. (हेही वाचा, Tomato Prices Increased Across Country: पुरवठा घटला, टोमॅटोचे दर गगनाला भिडले, प्रति किलो 80 ते 100 रुपये)

केंद्र सरकारने लागू केलेल्या मर्यादा आणि आदेशानुसार, या आदेशानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत तूर आणि उडीदसाठी साठा मर्यादा विहित करण्यात आली आहे. ही मर्यादा खालील प्रमाणे.

घाऊक विक्रेते-200 टन

किरकोळ विक्रेते- 5 टन

रिटेल आऊटलेट- 5 टन

मोठे साखळी किरकोळ विक्रेत्यांसाठीचे डेपो- 200 टन

मिलर्स- वार्षिक उत्पादन क्षमतेच्या 25% किंवा शेवच्या तीन महिन्यांच्या क्षमते येवढा

उल्लेखनिय म्हणजे तूर आणि उडीद आदींचा साठा करणाऱ्या व्यापारी, विक्रेते अथवा मोठ्या साखळी विक्रेत्यांना आपापल्या गोदामातील एकूण साठा अथवा त्याची स्थिती संबंधित पोर्टलवर घोषीत करण्याचेही आदेश आहेत. जे संबंधितांवर बंधनकारक असतात. केंद्र सरकारने म्हटले आहे की, राज्य सरकारे आपापल्या राज्यातील किमतींवर सतत लक्ष ठेवत आहेत आणि स्टॉक-होल्डिंग संस्थांच्या स्टॉक पोझिशनची पडताळणी करत आहेत. ज्यांनी स्टॉक लिमिट ऑर्डरचे उल्लंघन केले आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. भारत हा कडधान्यांचा मोठा ग्राहक आणि उत्पादक देश आहे. तो आपल्या वापराच्या गरजांचा एक भाग आयातीद्वारे भागवतो. भारतात प्रामुख्याने चणा, मसूर, उडीद, काबुली चना आणि तूर खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now