PhonePe Fraud: फोनपेद्वारे लोकांची फसवणूक करण्याचा नवा मार्ग; कदाचित आपणही अडकाल अशा सायबर चोरांच्या जाळ्यात, Watch Video
सर्वसामान्यांसह देशातील बँका आणि वित्तीय संस्थाची देखील ऑनलाइन फसवणूक होत आहे. सर्वसामान्य नागरिकांची गोपनीय माहिती आणि त्यांच्या बँक खात्यांच्या तपशिलावर लक्ष ठेऊन असणारे काही लोक आहेत. काही महिन्यांपूर्वी समोर आलेल्या गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, लॉकडाऊन दरम्यान अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीची सुरूवात झाल्यापासून देशात स्मार्टफोनद्वारे व्यवहार करण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांदेखील वाढल्या आहेत. हे फसवणूक करणारे लोक लोकांना चुना लावण्यासाठी सतत नवनवीन मार्ग शोधत असतात. महत्वाचे म्हणजे सर्वसामान्यांसह देशातील बँका आणि वित्तीय संस्थाची देखील ऑनलाइन फसवणूक होत आहे. सर्वसामान्य नागरिकांची गोपनीय माहिती आणि त्यांच्या बँक खात्यांच्या तपशिलावर लक्ष ठेऊन असणारे काही लोक आहेत. काही महिन्यांपूर्वी समोर आलेल्या गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, लॉकडाऊन दरम्यान अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.
सामान्यत: लोक गुगल (Google) वर जवळजवळ सर्व प्रकारच्या ‘ग्राहक सेवा क्रमांका’चा शोध घेतात. अगदी ई-कॉमर्स वेबसाइटपासून ते एखाद्या उत्पादनाची सेवा घेण्यापर्यंत गुगलवर विविध गोष्टींचे नंबर्स शोधले जातात. एका क्लिकवर हे नंबर्स मिळत असल्याने ते खूप सोपे ठरत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. मात्र तसे नाही. गूगलवरील असंख्य ग्राहक सेवा क्रमांक बनावट आहेत, जे ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या चोरांनी प्रविष्ट केले आहेत. आत्तापर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात ‘कस्टमर केअर’ असल्याचे भासवून लोकांना फसवले गेले आहे.
या व्यतिरिक्त, सायबर गुन्हेगार लोकांना बर्याच नवीन मार्गांनी त्यांच्या जाळ्यात अडकवत आहेत. खाली दिलेल्या युट्यूब व्हिडिओमध्ये फोनपे (PhonePe) फसवणूकीचा एक नवीन मार्ग दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये हा चोर फोनपेचा कस्टमर केअर कार्यकारी असल्याचे भासवत समोरच्या व्यक्तीशी संवाद साधत आहे. हा सायबर चोर व्यक्तीला पैसे परत करण्याच्या बहाण्याने त्या व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढून घेऊ इच्छित आहे. मात्र असे करण्यात तो यशस्वी होत नाही.
याठिकाणी हे देखील धान्यात ठेवावे की, सायबर चोर मिळत्या जुळत्या नावांचे बनावट युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) आयडी बनवून लोकांची फसवणूक करत आहेत. म्हणून, यूपीआय आयडीद्वारे व्यवहार करण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे फार महत्वाचे आहे. या व्यतिरिक्त, असे चोर एखाद्या व्यक्तीस डेबिट लिंक पाठवतात आणि त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून त्या लिंकवर क्लिक करण्यास सांगतात. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून युपीआय पिन टाकताच तुमच्या खात्यातून पैसे कट होतात. (हेही वाचा: Aadhaar PAN Link Last Date: आधार-पॅन कार्ड 'या' तारखेआधी करा लिंक, अन्यथा भरावा लागेल 10,000 रुपयांचा दंड)
डिजिटल पेमेंट एप फोनपेने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दावा केला होता की, त्याने देशात 25 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांची संख्या पार केली आहे. ऑक्टोबरमध्ये कंपनीने 83.5 कोटी यूपीआय व्यवहार केले, ज्याचा बाजारातील 40 टक्क्यांहून अधिक वाटा होता. ऑगस्टमध्ये या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मने म्हटले आहे की, पुढच्या एका वर्षात भारतभरातील 2.5 कोटीहून अधिक लहान व्यापारी या व्यासपीठावर डिजिटल पेमेंट करू शकतील. जवळजवळ 500 शहरांमधील कोट्यावधी दुकानांत फोनपेद्वारे व्यवहार केले जातात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)