Hyderabad: उष्माघातामुळे वधूचा मृत्यू; हैद्राबाद येथील तापमानीत वाढ
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर लग्नाच्या एक दिवस आधी मृत्यू झाला आहे.
Hyderabad: लग्नाच्या काही तासांपुर्वी हैद्राबाद (Hyderabad) येथील कुरुरम भीम जिल्ह्यातील एका वधूचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. गुंडला थिरूपती (32) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कौथला मंडलातील गुजलाबोरी गावात लग्नपत्रिकेचे वाटप करताना कडक उन्हाचा झटका लागाला. याचदरम्यान त्यांना कुटूंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. भर उन्हात मित्र परिवाराला पत्रिका वाटणे वधूच्या जीवाशी बेतले.लग्नाच्या काही तासांपुर्वी असे काही घडेल याचा विचारही कोणी केला नसावा. दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने लोकांचा अकास्मित मृत्यू होत आहे.
उन्हामुळे त्यांना जुलाब आणि उलट्या चालू झाल्या. प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना कुटुंबियानी कागदनदर येथील दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे. ह्या रुग्णालयात देखील त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाल्या नाहीत. त्यांच्या प्रकृती चिंताजनक झाल्याने मंगळवारी पुन्हा कुंटुंबियांनी गुंडला थिरुपती यांना मंचेरियल रुग्णालयात दाखल केले. रात्री त्यांचावर डाॅक्टरांनी उपचार केले. तापामान विभागाने हैद्राबाद येथील तापमान वाढल्याचे सांगितले आहे.
याचदरम्यान डाॅक्टरांनी पहाटे तीन वाजता त्यांना मृत घोषित केले. तापमाण विभागाने कौथला मंडला येथील तापमाचे प्रमाण 40 ते 43 अंश सेल्सियस नोंदिवले आहे.