ठळक बातम्या

Tilak Verma Milestone: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिलक वर्माने रचला एक खास विक्रम, विराट कोहलीचा विक्रम काढला मोडीत

Nitin Kurhe

22 वर्षीय तिलक वर्माच्या शानदार कामगिरीने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो एका टोकाला एकटा उभा राहिला आणि टीम इंडियाला 2 विकेटने विजय मिळवून देण्यास मदत केली. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज तिलक वर्माने टी-20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Paragliding Safety Regulations: सुरक्षा नियमांचे पूर्ण पालन केल्यावरचं पॅराग्लायडिंगला परवानगी दिली जाईल; गोवा सरकारचे स्पष्टीकरण

Bhakti Aghav

ऑपरेटर्सनी पॅराग्लायडिंग मार्गदर्शक तत्त्वांचे (Paragliding Guidelines) पालन केल्यानंतर त्यास पुन्हा परवानगी दिली जाईल, असं गोवा सरकारने (Goa Government) आज स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील एका महिला पर्यटकासह दोघांच्या मृत्यूनंतर, पर्यटन विभागाने पुढील आदेशापर्यंत संपूर्ण गोव्यात सर्व प्रकारच्या पॅराग्लायडिंगला स्थगिती देण्याचे आदेश दिले होते.

Most Runs Against India In T20 International: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाविरुद्ध 'या' फलंदाजांनी केल्या आहेत सर्वाधिक धावा; पाहा कोण आहे टाॅपवर

Nitin Kurhe

दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा दोन विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.

Student Dies After Run Over by Dumper In Baramati: बारामतीमध्ये डंपरने चिरडून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू, पहा अपघाताचा थरार

Bhakti Aghav

वेगाने येणाऱ्या डंपरने मोटारसायकलला धडक दिल्याने एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी हे विद्यार्थी कॉलेजमधून घरी जात होते. यावेळी डंपरने अचानक यूटर्न घेतला. त्यानंतर समोरून दुचाकीवर येणारे दोन विद्यार्थी खाली कोसळले. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

Advertisement

Pakistan vs West Indies, 2nd Test Day 2 Stumps Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, पाकिस्तानला पराभवाचा धोका, वेस्ट इंडिज विजयापासून फक्त 6 विकेट्स दूर; येथे पाहा स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

पहिल्या कसोटीत शान मसूदच्या संघाने दमदार कामगिरी केली आणि सामना 127 धावांनी जिंकला. अशा परिस्थितीत, वेस्ट इंडिज दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करून मालिका 1-1 अशी बरोबरीत संपवू इच्छित असेल, तर पाकिस्तान संघ मालिका जिंकू इच्छित असेल. या मालिकेत पाकिस्तानची कमान शान मसूदच्या हातात आहे. तर, वेस्ट इंडिजचे नेतृत्व क्रेग ब्रेथवेटकडे आहे.

Gasoline Tanker Blast In Nigeria: नायजेरियात पेट्रोल टँकरशी झालेल्या धडकेनंतर भीषण स्फोट; 18 जणांचा मृत्यू

Bhakti Aghav

नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सने शनिवारी संध्याकाळी एका निवेदनात म्हटले आहे की, आग्नेय राज्यातील एनुगुमधील एनुगु-ओनित्शा एक्सप्रेसवेवर पेट्रोल वाहून नेणाऱ्या एका टँकरने नियंत्रण गमावले आणि 17 वाहनांना धडक दिली. त्यानंतर टँकरला भीषण आग लागली.

IND vs ENG 3rd T20 2025 Pitch Report: राजकोटमध्ये चौकार-षटकारांचा पडणार पाऊस की गोलंदाज करतील कहर? जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी

Nitin Kurhe

मालिकेतील तिसरा सामना आता राजकोटमध्ये खेळला जाणार आहे, जिथे टीम इंडिया मालिकेत 3-0 अशी अजिंक्य आघाडी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्याच वेळी, इंग्लिश संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

Deputy CM Eknath Shinde यांनी जखमी बाईकस्वाराला मदत करण्यासाठी थांबवला ताफा (Watch Video)

Dipali Nevarekar

आपल्या ताफ्यातील गाडी आणि पोलिस सोबत देऊन त्या तरुणाला राजावाडी रुग्णालयात दाखल करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Advertisement

Saif Ali Khan Stabbing Case: अभिनेता सैफ अली खानवरील चाकूहल्ला प्रकरणात ट्विस्ट; वांद्रे येथील निवासस्थानातून गोळा केलेले बोटांचे ठसे आरोपीच्या बोटांच्या ठशांशी जुळले नाही

Bhakti Aghav

पोलिस सूत्रांचा हवाला देत अनेक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) फिंगरप्रिंट ब्युरोने सिस्टीम-जनरेटेड अहवालात असे सिद्ध झाले आहे की खानच्या घरातून गोळा केलेल्या 19 बोटांच्या ठशांपैकी एकही बोटांचा ठसा शरीफुलशी जुळत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून शरीफुल इस्लामी या व्यक्तीला अटक केली होती.

Train Derailment in Howrah: पश्चिम बंगालमधील हावडा येथे रेल्वे क्रॉसिंगदरम्यान डब्बे रुळांवरून घसरल्याची घटना (Video)

Jyoti Kadam

पश्चिम बंगालच्या पद्मपुकुर रेल्वे लेव्हल क्रॉसिंगजवळ रेल्वेचे दोन डब्बे रुळांवरून घसरल्याची घटना घडली. ज्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली.

PAK vs WI 2nd Test 2025 Day 2 Scorecard: दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजने पाकिस्तानला दिले 254 धावांचे लक्ष्य, क्रेग ब्रेथवेटने झळकावले अर्धशतक; पाहा स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

दुसऱ्या दिवशी, वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 66.1 षटकांत 244 धावांवर आटोपला. यासह, पाहुण्या संघाने 253 धावांची आघाडी घेतली आणि पाकिस्तानला 254 धावांचे लक्ष्य दिले. वेस्ट इंडिजसाठी कर्णधार क्रेग ब्रेथवेटने दुसऱ्या डावात 74 चेंडूत 54 धावा हा सर्वोच्च धावसंख्या बनवला.

Mahakumbh Mela 2025: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाकुंभ मेळा 2025 मध्ये होणार सहभागी; प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमात करणार पवित्र स्नान

Jyoti Kadam

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी महाकुंभ मेळा 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. शुक्रवारपर्यंत 10.80 कोटींहून अधिक लोकांनी गंगा-यमुना-सरस्वती संगमात पवित्र स्नान केले.

Advertisement

Guillain-Barre Syndrome चा महाराष्ट्रामध्ये पहिला बळी

Dipali Nevarekar

रूग्णाला अशक्तपणा जाणवत होता त्यामुळे त्याला सोलापूर मध्ये हॉस्पिटल मध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्याला GBS झाल्याचे निदान केले.

IND vs ENG 3rd T20I 2025 Live Streaming: कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहता येईल भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा टी-20 सामना, एका क्लिकवर येथे जाणून घ्या सर्वकाही

Nitin Kurhe

कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 7 विकेट्सने पराभव केला, तर चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण तिलक वर्माच्या खेळीमुळे भारतीय संघाला 2-1 असा रोमांचक विजय मिळवता आला. आता दोन्ही संघ तिसऱ्या सामन्यात एकमेकांसमोर येतील.

Dr K.M Cherian Passes Away: भारतातील पहिली यशस्वी कोरोनरी आर्टरी शस्त्रक्रिया करणारे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. केएम चेरियन यांचे निधन

Bhakti Aghav

डॉ. के. एम. चेरियन यांनी 1975 मध्ये चेन्नईतील पेरांबूर येथील सदर्न रेल्वे मुख्यालय रुग्णालयात भारतातील पहिली यशस्वी कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया केली. याशिवाय, चेरियन यांनी पहिले हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण, पहिले बालरोग प्रत्यारोपण देखील केले आहे.

Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर करिना कपूरच्या गैरहजेरीबाबत अनेक प्रश्नचिन्ह, ट्विंकल खन्नाने दिले सडेतोड उत्तर

Shreya Varke

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील राहत्या घरी झालेल्या हल्ल्याने इंडस्ट्री हादरली आहे. सैफ गंभीर जखमी झाला असून त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथून त्याला गेल्या आठवड्यात डिस्चार्ज देण्यात आला होता. या घटनेनंतर सैफच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच करिना कपूरच्या गैरहजेरीबाबत काही भन्नाट अफवा पसरू लागल्या आहेत . ट्विंकल खन्नाने नुकतेच टाइम्स ऑफ इंडियामधील आपल्या कॉलमच्या माध्यमातून या अफवांना सडेतोड उत्तर दिले आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर सर्वत्र असुरक्षिततेची भावना आहे.

Advertisement

UP Shocker: शेतात कीटकनाशक फवारणी केल्यानंतर हात न धुता जेवण केल्यामुळे युवकाचा मृत्यू

Shreya Varke

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात शेतात कीटकनाशक फवारणी करून घरी पोहोचल्यानंतर हात न धुता खाल्ल्यामुळे एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. स्टेशन हाऊस ऑफिसर रंजना सचान यांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया (वय २७, रा. महावन शहर) शनिवारी शेतात कीटकनाशक फवारणी करून घरी येताच जेवायला बसला आणि हात न धुता जेवायला लागला.

GBS Outbreak In Pune: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव; रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर PMC खाजगी टँकरच्या पाण्याची गुणवत्ता तपासणार

Bhakti Aghav

पुणे महानगरपालिका (PMC) नांदेडमधील एका विहिरीतून होणाऱ्या पाणीपुरवठ्याची चौकशी करत आहे. तसेच महानगरपालिका आता या भागांना पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या टँकरची तपासणी करणार आहे.

IND vs BAN ICC Under 19 Womens T20 WC 2025 Scorecard: अपराजित भारतीय संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश; बांगलादेश संघाचा 8 विकेट्सने पराभव

Jyoti Kadam

गोंगाडी त्रिशा हिने 31 चेंडूत 8 चौकारांच्या जोरावर 40 धावा केल्या. भारताकडून वैष्णवी शर्माने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

Maharashtra: बीड आणि धुळ्यात मंत्र्यांच्या उपस्थितीत दोघांनी आत्मदहनाचा केला प्रयत्न

Shreya Varke

बीड आणि धुळे जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. बीड येथील शासकीय विश्रामगृहात जात असताना मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्यासमोर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. बीड नगरपालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप करणारे नितीन मुजमुले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Advertisement