कलाकारांनी केलेल्या कामाचे पैसे द्या, अन्यथा त्यांच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ येईल - निया शर्मा
मनमीतवर कर्जाचा बोजा होता. लॉकडाऊनमुळे आर्थिक उत्पन्नाचे साधन न मिळाल्याने त्याने आपली जीवनयात्रा संपवली. मनमीतच्या मृत्यूनंतर टीव्ही अभिनेत्री निया शर्मा ने दु:ख व्यक्त केलंय. कलाकारांनी केलेल्या कामाचे पैसे त्यांना द्या, नाहीतर त्यांच्यावरही मनमीत ग्रेवाल प्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी मागणी नियाने निर्मात्यांना उद्देशून केली आहे.
गेल्या आठवड्यात टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल (Manmeet Grewal) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. मनमीतवर कर्जाचा बोजा होता. लॉकडाऊनमुळे (Lockdown) आर्थिक उत्पन्नाचे साधन न मिळाल्याने त्याने आपली जीवनयात्रा संपवली. मनमीतच्या मृत्यूनंतर टीव्ही अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) ने दु:ख व्यक्त केलंय. कलाकारांनी केलेल्या कामाचे पैसे त्यांना द्या, नाहीतर त्यांच्यावरही मनमीत ग्रेवाल प्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी मागणी नियाने निर्मात्यांना उद्देशून केली आहे.
नियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये निया शर्मा ने म्हटलं आहे की, मनमीत ग्रेवाल ने आत्महत्या केली. मी मनमीतला व्यक्तीश: ओळखत नव्हते. मात्र, त्याने आर्थिक संकटामुळे आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही अत्यंत दु:खद घटना आहे. लॉकडाऊनमुळे माझ्या काही मित्रमंडळींचीदेखील अशीच अवस्था झाली आहे. (हेही वाचा - जोपर्यंत शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचत नाही, तोपर्यंत मदत थांबणार नाही - सोनु सूद)
लॉकडाऊनमुळे त्यांच्याकडे कोणतेही काम नाही. याशिवाय याआधी केलेल्या कामाचे पैसे न मिळाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी निर्मात्यांना विनंती करते की, कलाकारांच्या कामाचे पैसे त्यांना द्या. अनेक लहान कलाकार मजुरांप्रमाणेच रोजंदारीवर काम करतात. आर्थिक अडचणींमुळे त्यांच्यावरही मनमीत प्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते, असंही नियाने आपल्या पोस्टेमध्ये म्हटलं आहे.
मनमीतच्या आत्महत्येनंतर नियाने शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नियाच्या चाहत्यांनी या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. निया शर्मा टिव्हीवरील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. निया आपल्या हॉट अंदामुळे नेहमीच चर्चेत असते. निया शर्मा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नेहमी तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 2018 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया दुसऱ्या स्थानावर होती.