Bharat Motion Poster: भारत सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट! 'सलमान खान' ने शेअर केला एका दशकातील 5 हट्के लुक्स मधील प्रवास (Watch Video)

यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर म्हणजे 5 जून 2019 ला ‘भारत’ सिनेमा रिलिज होईल.

Bharat Motion Poster (Photo Credits: YouTube)

Salman Khan's Bharat Motion Poster: अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) दिगदर्शित ‘भारत’(Bharat)सिनेमाचं मोशन पोस्टर आज सलमान खानने (Salman Khan) सोशल मीडीयामध्ये शेअर केलं आहे. सुरूवातीला ‘भारत’ सिनेमाचा टीझर आणि त्यापाठोपाठ सलग पाच  दिवस सलमान खानचे ‘भारत’ सिनेमातील लूक्स प्रदर्शित केल्यानंतर आज मोशन पोस्टरद्वारा सलमान खानचे 1964 ते 2010 या कालखंडातील सिनेमातील लूक्स मोशन पोस्टरद्वारा दाखवण्यात आले आहे.Bharat Movie Teaser: धर्मनिरपेक्ष भारतीयांना विचार करायला लावणार सलमान खानचा 'भारत'

भारत सिनेमा मोशन पोस्टर 

सलमान  खानने मोशन पोस्टर शेअर करताना ‘देखिए भारत का सफर इस ईद पर’ असं कॅप्शन लिहलं आहे. या सिनेमामध्ये सलमान खान नव्वदीतील तरूण ते नेव्ही ऑफिसर आणि पेपर अ‍ॅन्ड सॉल्ट लूकमधील सलमान रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'भारत' सिनेमातील कतरिना कैफ हिचा लूक आऊट (Photo)

भारत  सिनेमात सलमान खान सोबत कॅटरिना कैफ प्रमुख भूमिकेत  झळकणार आहे. सोबत तब्बू, दिशा पटनी, सुनील ग्रोव्हर, नोरा फतेही हे कलाकार दिसतील. यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर म्हणजे 5 जून 2019 ला हा सिनेमा रिलिज होईल. येत्या 24 एप्रिलला भारत सिनेमाचा ट्रेलर रसिकांच्या भेटील येईल अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर येणार आहे.