Vijay Mallya Assets Seized: विजय माल्या याची फ्रान्स मधील तब्बल 1.6 मिलियन युरोची प्रॉपर्टी ED कडून जप्त
ईडीने फ्रान्स (France) मधील विजय माल्या याच्या 1.6 मिलियन युरोची प्रॉपर्टी जप्त केली आहे.
Vijay Mallya Assets Seized: किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडचे मालक विजय माल्या यांच्या विरोधात आज (4 डिसेंबर) ईडी (ED) कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने फ्रान्स (France) मधील विजय माल्या याच्या 1.6 मिलियन युरोची प्रॉपर्टी जप्त केली आहे. प्रॉपर्टी जप्त केल्यानंतर ईडीकडून या संदर्भातील ट्वीट त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आले आहे. ईडीच्या आग्रहाखातर विजय माल्या याची 32 अवेन्यू फोच (FOCH), फ्रान्स मधील संपत्ती ही फ्रेंच अथॉरिटीने जप्त केली आहे.(विजय माल्या चे नवे ट्विट; 'कर्जाची 100% रक्कम परत देण्याची तयारी होती मात्र बँक आणि ED ऐकत नाही' म्हणत केला मोठा दावा)
फ्रान्समध्ये जप्त करण्यात आलेल्या प्रॉपर्टीची किंमत तब्बल 1.6 मिलियन युरो (जवळजवळ 14.43 कोटी रुपये) आहे. तपासात प्रमुख बाब समोर आली आहे की, किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडच्या बँक खात्यामधून विदेशात मोठी रक्कम काढली गेली.(विजय माल्याचा उधारीवर उदरनिर्वाह; रोजचे खर्च भागवण्यासाठी पत्नी, मुलांवर अवलंबून)
भारतीय उद्योगपती विजय माल्याने 9 हजार कोटी रुपयांहून अधिक बँकांच्या कर्जासंबंधित फसवणूक केल्याच्या आरोप त्याच्यावर लावला गेला आहे. सध्या विजय माल्या ब्रिटेन येथे राहत आहे. माल्या याच्या प्रत्यार्पणासाठी काही महिन्यांपूर्वी भारताने युके सरकारकडे आग्रह केला होता. भारत सरकारने असे म्हटले होते की, विजय मल्याचे लवकरात लवकर प्रत्यार्पण होण्यासाठी ब्रिटिश सरकार सोबत संपर्क साधत आहोत.
दरम्यान, जानेवारी 2019 मध्ये मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत विजय माल्या याला कोर्टाने पळ काढणारा आरोपी घोषित केले होते. तर मार्च 2019 पासून माल्या ब्रिटेन येथेच राहत आहे.