मॉस्कोत उघडले अनोखे वेश्यालय; ग्राहकांसोबत केले जाते 'डर्टी टॉक्स'

लिमडॉल्सने ग्राहकांना आकर्शित करण्यासाठी या डॉल्स अधिक सुधारीत बनवल्या आहेत.

(संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

रशियात उघडण्यात आलेल्या एका वेश्यालयाची जगभर चर्चा सुरु झाली आहे. या वेश्यालयाबाबत जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्याचे समर्थन केले आहे. तर, काहींनी त्यावर टोकाची टीकाही केली आहे. या वेश्यालयाची खासियत अशी की, रशियातील हे पहिले रोबोट सेक्स डॉल वेश्यालय आहे. 'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, लिमिडॉल्स फ्रँचायजीने हे वेश्यालय उघडले असून, या कंपनीने बर्लिलोना आणि इटलीमध्येही अशा प्रकारची सेक्स डॉल म्यूझीयम यापूर्वीच उघडली आणि चालवली आहेत. मॉस्कोचे हे वेश्यालय यापूर्वीच्या काही वेश्यालयांपेक्षा काहीशी अधिक सुधारीत आहेत. इथल्या डॉल्सचे तापमान कंट्रोल करता येऊ शकते. इतकेच नव्हे तर, या वृत्तात या रोबोट डॉल ग्राहकांशी 'डर्टी टॉक'ही करतात.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लुमिडॉल्सने मॉस्कोमधल्या या सेक्स डॉल्सचे नाव एमाअसे ठेवले आहे. पाच फूट ४ इंच उंचीच्या या रोबोट डॉल ग्राहकांनी स्पर्श करताच प्रतिक्रियाही देतात. पण, या वेश्यालयात जाण्यासासठी आकारण्यात येणारे शुल्कही तितकेच महागडे आहे. प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, प्रतितास ८० डॉलर इतका या गृहाचा दर आहे.

प्राप्त माहितीनुसार, या रोबोट डॉल ग्राहकांसोबत इंग्रजी आणि चीनी भाषेत बोलतात. लिमडॉल्सने ग्राहकांना आकर्शित करण्यासाठी या डॉल्स अधिक सुधारीत बनवल्या आहेत. मॉस्कोतील लोकांची जीवनशैली विचारात घेऊन हे वेश्यालय मॉस्कोच्या बिजनेस सेंटरमध्येच सुरु करण्यात आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif