UV-Emitting LED Lights प्रभावीपणे आणि कमी खर्चात Novel Coronavirus चा खात्मा करू शकतात; संशोधकांचा दावा
कोरोना वायरस हा स्वस्त एलईडी बल्बला देखील एक्सपोस्ड झाला तरी तो मरू शकतो. यामध्ये उर्जा देखील वाचवली जाऊ शकते आणि त्यामध्ये पारा देखील नसतो.
बॅक्टेरिया आणि वायरस यांना मारण्यासाठी अल्ट्रा वायलेट रेडिएशन वापरलं जातं. ही अगदी सहज वापरली जाणारी पद्धत आहे. वॉटर प्युरिफायर्समध्येही डिसइंफेक्टिंग बल्ब वापरले जातात. दरम्यान संशोधकांच्या दाव्यानुसार, 285 नॅनोमीटर लांबीच्या ऑप्टिकल वेवलेंथ इतकीच 365 नॅनोमीटरची वेंवलेंथ अर्धा मिनिटांमध्ये 99.9% कोरोना वायरस मारू शकते. 285nm LED bulbs हे 265 nm bulbs पेक्षा स्वस्त आणि सहज उपलब्ध देखील आ हेत. Journal of Photochemistry and Photobiology B: Biology मध्ये त्याबद्दलचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
प्रोजेक्ट लीडर प्रोफेसर Hadas Mamane यांनी वर्तवलेल्या आशेनुसार येत्या काही काळात या टेक्नॉलॉजीचा प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो. सध्या सारं जग कोरोना वायरसचा खात्मा करण्यासाठी प्रभावी पद्धतीचा वापर करण्यासाठी, शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. Coronavirus Effects: कोरोना विषाणूमुळे संकटामध्ये भर; 2020 च्या मध्यापर्यंत जगभरातील तब्बल 8 कोटीपेक्षा जास्त लोकांचे सक्तीने स्थलांतर- UN.
सध्या बस, ट्रेन, स्पोर्ट्स हॉल किंवा विमानं यांचं निर्जतूकीकरण करण्यासाठी केमिकल स्प्रे वापरला जात आहे. त्यासाठी लोकांना काम करावं लागतं. केमिकलला देखील त्याचा पूर्ण प्रभाव साधता यावा यासाठी काही वेळ द्यावा लागतो.
हॉस्पिटलमध्ये अनेक ठिकाणी मेडिकल स्टाफअला एखादी वस्तू डिसइंफेक्ट करण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. यामध्ये हॉस्पिटलचा काही भाग, की बोर्ड सारख्या वस्तू यांचा समावेश आहे. त्यामुळे इंफेक्शन वाढतं आणि क्वारंटीन करावं लागत आहे. LED bulbs वर आधारित disinfection systems असल्यास त्याच्यामुळे वेंटिलेशन सिस्टम आणि एसी यांचादेखील त्यामध्ये समावेश केला जाऊ शकतो. यात स्टरलाईज्ड हवा आतमध्ये घेऊन नंतर ती सोडली जाऊ शकते.
दरम्यान LED bulbs द्वारा ultraviolet light बाहेर पडणारा असल्याने त्याचा वापर कोरोना वायरसला मारण्यासाठी होऊ शकतो. असे संशोधनातून समोर आल्याचं Mamane म्हणाल्या आहेत. कोरोना वायरस हा स्वस्त एलईडी बल्बला देखील एक्सपोस्ड झाला तरी तो मरू शकतो. यामध्ये उर्जा देखील वाचवली जाऊ शकते आणि त्यामध्ये पारा देखील नसतो.
लवकरच संस्थात्मक पातळीवर काही जुळवाजुळव करून रोबोटिक सिस्टममध्ये बलब लावणं, air conditioning, vacuum मध्ये बल्ब लावणं आणि वॉटर सिस्टम मध्ये त्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात जागा डिसइंफेक्ट करण्यास मदत होऊ शकते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)