Cambodia Cyber Slaves: नोकरी, पैसा याच्या नावाखाली ऑनलाईन क्राईम; कंबोडियामध्ये हजारो नागरिक बंदीवान; बनवले सायबर गुलाम

या लोकांकडून इंटरनेट विश्वात गुन्हेगारी कृत्य करुन घेता यासाठी त्यांना कंबोडिया देशात 'सायबर गुलाम' (Cyber Slaves,Cambodia) बनविल्याचे वृत्त आहे.

Cyber Slaves | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

International Cyber Fraud: भारतीय नागरिकांना नोकरी, पैसे आणि आलिशान जीवनशैली देण्याचे आमिषदाखवून सायबर क्राईम आणि इंटरनेट घोटाळा, ऑनलाईन फसवणूक अशा विविध गुन्ह्यांमध्ये गोवल्याचे धक्कादायक वृत्त पुढे आले आहे. या लोकांकडून इंटरनेट विश्वात गुन्हेगारी कृत्य करुन घेता यासाठी त्यांना कंबोडिया देशात 'सायबर गुलाम' (Cyber Slaves,Cambodia) बनविल्याचे वृत्त आहे. धक्कादायक म्हणजे कंबोडिया येथे बंदीवान केलेल्या भारतीयांची संख्या सुमारे 5,000 इतकी असल्याची माहिती विविध प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्ताच्या माध्यमातून दिली आहे. हा एक प्रकारचा आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड आहे. त्यातून या नागरिकांची सुटका करण्याची मागणी केली जात आहे.

कंबोडियातील कथीत साबर फ्रॉडबद्दल एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, तब्बल 5,000 भारतीय नागरिकांना कथीतरित्या ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना भारतात परत आलेल्या व्यक्तींना लक्ष्य करून ऑनलाइन घोटाळे करण्यास भाग पाडले गेले आहे. गेल्या सहा महिन्यांत सायबर घोटाळा करणाऱ्या आणि नेटवर्क चालवणाऱ्यांनी अनेकांना फसवणून तब्बल 500 कोटी रुपयांची कमाई केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाची माहिती बाहेर येताच भारत आणि कंबोडियाने या बेकायदेशीर नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी संयुक्त प्रयत्न सुरु केले आहेत. (हेही वाचा, वाचा: Cyber Fraud in India: गेल्या वर्षी सायबर फसवणुकीमुळे भारतीयांचे 7,488.6 कोटी रुपयांचे नुकसान; यादीत महाराष्ट्र अव्वल .)

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनानुसार, रोजगाराच्या संधींचे खोटे आश्वासन आणि आमिषाला भुलून कंबोडियात आलेले भारतीय नागरिक अत्याधुनिक सायबर क्राइम रॅकेटला बळी पडले आहेत. या व्यक्तींना, बेकायदेशीर कामे आणि सायबर गुन्हे करण्यास भाग पाडले गेले. हे सर्वजन दबावामुळे भारतातील संशयास्पद पीडितांना फसवण्यात, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना गंडा घालण्यात आणि पैसे उकळण्यासाठी विविध फसव्या युक्त्या वापरण्यात गुंतले असल्याची नोंद आहे.

एका वरिष्ठ केंद्रीय कर्मचाऱ्याची फसवणूक झाल्याने या प्रकरणाचा भांडाफोड झाला. प्राप्त माहितीनुसार, हा कर्मचारी 67 लाखांहून अधिक रकमेच्या सायबर फसवणुकीला बळी पडला. त्यानंतर त्याने केलेल्या तक्रारीनंतर या विस्तृत घोटाळ्याचा खुलासा झाला. त्यानंतरच्या पोलिस तपासात सायबर क्राइम सिंडिकेटशी संबंधित आठ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशी आणि तपासात अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. ज्यामध्ये आढळून आले की, सायबर गुन्हेगारी करणाऱ्या लोकांना बेकायदेशीर कामे करायला लावली जात आहेत. ही कामे करण्यास जर त्यांनी नकार दिला तर त्यांना अन्न-पाण्यावाचून उपाशी ठेवणे, त्यांना मारहाण करणे, त्यांना विद्युत प्रवाहाचे झकटे (शॉक) देणे, एकांतात टाकणे अशा अनेक गोष्टींद्वारे त्रास दिला जात आहे. छळ केला जात आहे.

कंबोडियातून सुटका करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एक स्टीफन याने घोटाळ्याबाबत माहिती दिली. ज्यातून अनेक गुंतागुंतीचे कामकाज उघड झाले. चांगल्या रोजगाराच्या आमिशाला भुलून विदेशात गेलेल्या भारतीयांना लक्ष्य केले जाते. त्यांना सोशल मीडियावर बनावट खाती उघडण्यास सांगितली जातात. ऑनलाईन सावज शोधून त्यांची फसवणूक केली जाते. धक्कादायक म्हणजे लोकांना फसविण्यासाठी त्यांना दररोजचे लक्ष्य ठरवून दिले जाते. शिक्षेच्या धमक्या देऊन त्यांना दररोज कोटा पूर्ण करण्यास पाडले जाते. हे "सायबर गुलाम" अत्यंत प्रतिकूल परिस्थित सामना करत आहेत. त्यांची सोडवणूक होणे गरजेचे असल्याचे तीव्रतेने पुढे आले आहे.