WhatsApp मध्ये नवे फिचर रोलआउट, आता डेस्कटॉप युजर्सला मिळणार कॉलिंगची सुविधा
कंपनी युजर्सला उत्तम सुविधा देण्यासाठी नवे अपेडट्स आणि फिचर्स घेऊन येतात. मात्र आता कंपनीने डेस्कटॉप युजर्सकडे लक्ष देत नवे फिचर रोलआउट केले आहे.
इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatApp मध्ये युजर्ससाठी काही खास उयोगी आणि फिचर्स दिले गेले आहेत. कंपनी युजर्सला उत्तम सुविधा देण्यासाठी नवे अपेडट्स आणि फिचर्स घेऊन येतात. मात्र आता कंपनीने डेस्कटॉप युजर्सकडे लक्ष देत नवे फिचर रोलआउट केले आहे. त्याच्या मदतीने युजर्सला आता डेस्कटॉपच्या माध्यमातून WhatsApp कॉलिंग करता येणार आहे. समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार, हे फिचर सध्या काही युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले आहे.(Privacy Policy संदर्भातील भारताच्या प्रश्नांवर WhatsApp ने दिले स्पष्टीकरण- 'पारदर्शकता आणणे हे आमचे उद्दीष्ट')
कोविड19 च्या काळात जगभरातील लोक एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंग एक लोकप्रिय फिचर्स आणले आहे. युजर्स याच दरम्यान ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगचा सर्वाधिक फायदा घेत आहेत. ही सुविधा फक्त WhatsApp च्या मोबाईल अॅप मध्ये उपलब्ध नव्हती. डेस्कटॉपच्या माध्यमातून कॉलिंगसाठी झूम आणि गुगल मीट चा उपयोग केला जात आहे. परंतु आता व्हॉट्सअॅपने डेस्कटॉप कॉलिंग फिचर रोलाउट केले आहे. जे झूम आणि गुगल मीटला टक्कर देणार आहे.(WhatsApp, Telegram, Signal, iMessage यांना एकत्रित करणारा नवा Beeper App लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ट्यं)
Tweet:
WhatsApp च्या नव्या फिचरची माहिती WABetaInfo यांच्याकडून ही माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपने डेस्कटॉपसाठी व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंग फिचर युजर्ससाठी आणले आहे. त्यानंतर काही युजर्सने या फिचरचा स्क्रिनशॉट सुद्धा शेअर केला आहे. ज्यामध्ये WhatsApp च्या डेस्कटॉप वर्जनवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फिचर दिसून येत आहे. अद्याप हे फिचर बीटा वर्जन रोलाउट केले आहे. याचा लाभ काही युजर्सला घेता येणार आहे. परंतु अद्याप सर्व युजर्सला हे फिचर उपलब्ध करुन देण्याबद्दल काही घोषणा करण्यात आलेली नाही.