NASA ने टिपलं बुलढाण्यातील लोणार सरोवराच्या हिरव्या ते गुलाबी रंगातील रूप; जाणून घ्या पाण्याचा रंग बदलण्यामागे काय असू शकतात शक्यता
यामध्येही पाण्याचा रंग बदलला असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. अद्याप शास्त्रज्ञांना, संशोधकांनाही नेमका लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग का बदलला त्याचं ठोस कारण ठाऊक नाही.
काही दिवसांपूर्वी बुलढाण्यातील (Buldhana) लोणार सरोवराचं (Lonar Lake) पाणी गुलाबी (Rosy Pink)झाल्याने ते चर्चेमध्ये आलं होतं. 5000 वर्षापूर्वी उल्कापातामधून लोणार सरोवराची निर्मिती झाली आहे. अचानक या सरोवराच्या पाण्याचा रंग हिरव्या मधून गुलाबी होण्यामागे पाण्यामधील अल्गे (Algae) आणि क्षार किंवा खारटपणा (Salinity) ही कारणं असू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सामान्य नागरिकांना अचानक लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग गुलाबी दिसू लागल्याने आश्चर्य वाटत आहे. नासा कडून देखील लोणार सरोवराचे 25 मे आणि 10 जून दिवशी टिपलेले शेअर करण्यात आले आहेत. यामध्येही पाण्याचा रंग बदलला असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. अद्याप शास्त्रज्ञांना, संशोधकांनाही नेमका लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग का बदलला त्याचं ठोस कारण ठाऊक नाही.
मुंबई पासून 500 किमी लांब बुलढाण्यातील लोणार सरोवर हे अनेकांच्या आकर्षणाचा भाग आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक पर्यटक लोणार सरोवर बघण्यासाठी थांबतात. ते पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाचे स्थळ आहे. दरम्यान या सरोवरातील पाणी हिरव्या रंगाचे आणि खारट चवीचे आहे. लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग बदलून झाले लाल; नमुना गोळा करून कारण शोधण्याच्या प्रयत्नात वनविभाग (See Photo).
NASA ने टिपलेला लोणार सरोवराच्या पाण्यातील बदल
NASA च्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियामधील Lake Hillier देखील गुलाबी रंगाच्या पाण्याचे आहे. मात्र ते कायम गुलाबी रंगाचेच होते त्यामध्ये काही दिवसांत बदल झालेले नाहीत. दरम्यान भारतामधील लोणार सरोवरातील पाण्याचा रंग गुलाबी होण्यामागे पाण्यातील क्षार (salinity)वाढणं हे एक कारण असू शकतं. कोरड्या वातावरणामध्ये उष्णता वाढत असल्याने बाष्पीभवन होताना पाण्याचं प्रमाण कमी होतं. इराण मध्येही Lake Urmia मध्ये उन्हाळ्यात पाण्याचं प्रमाण कमी होत असल्याने मायक्रोऑर्गेझम त्यांचे रंग दाखवतात.
भूगर्भशास्त्रज्ञ गजानन खरात
लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग नेमका बदलला यावर संशोधन करण्यासाठी सध्या राज्य सरकारच्या वनविभागाकडून नमुने तपासण्यासाठी नेले गेले आहेत. बॉम्बे हाय कोर्टाने देखील पर्यावरण क्षेत्रात काम करणार्यांना नमुने तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
काहींच्या मते कोरोना संकट काळात लॉकडाऊन जाहीर झाल्याचा परिणाम देखील असू शकतो असा तर्क लावण्यात येत आहे. मात्र बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे भूगोल विभाग प्रमुख मदन सूर्यवंशी यांनी हा दावा AFP शी बोलताना फेटाळून लावला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या तलवात हेलोबॅक्टेरिया असून ते गुलाबीच रंगाचे असल्याने अतिक्षार युक्त पाण्याचा रंग गुलाबी झाला. मात्र नासाच्या मते गुलाबी रंग सारखा बदलू शकत नाही.