IPL Auction 2025 Live

'Mangalyaan' चं इंधन, बॅटरी संपल्याने 8 वर्षांनी संपर्क तुटला - रिपोर्ट्स

त्याचं लॉन्चिंग PSLV-C25 द्वारा करण्यात आलं होतं.

मंगळ ग्रह ( फोटो सौजन्य - फेसबुक )

भारताचं मिशन मंगळयान (Mangalyaan) 8 वर्ष 8 दिवसांनी संपल्याची माहिती समोर आली आहे. मंगळयानातील इंधन, बॅटरी संपल्याने ही मोहिम संपली आहे. भारताने 5 नोव्हेंबर 2013 ला मंगळयान लॉन्च केले होते. त्यानंतर 24 सप्टेंबर 2014 दिवशी हे मंगळाच्या कक्षेत पोहचलं होतं. त्या मिशन द्वारा भारत हा जगातला देश ठरला होता जो थेट मंगळापर्यंत पोहचला आहे. ISRO च्या एका सुत्राने PTI ला माहिती देताना 'आता इंधन संपलेलं असून सॅटलाईट बॅटरी देखील संपली आहे त्यामुळे लिंक तुटली आहे'. दरम्यान इस्त्रोने याबाबतची अधिकृत माहिती किंवा ट्वीट केलेलं नाही.

इस्त्रोच्या वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, मार्स आर्बिटर मिशन आपलं काम पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. या ऑर्बिटरने 8 वर्ष काम केले आहे. त्याची क्षमता केवळ 6 महिने काम करण्याची होती. त्यानुसारच त्याला बनवण्यात आले होते. यावर आधरित बॉलिवूड मध्ये 'मिशन मंगल' नावाने एक सिनेमा देखील प्रदर्शित झालेला आहे.

मंगलयान 2013 मध्ये लॉन्च झाला होता. त्याचं लॉन्चिंग PSLV-C25 द्वारा करण्यात आलं होतं. मार्स आर्बिटर भारतामधील पहिलं इंटरप्लेनेटरी मिशन मध्ये लॉन्च करण्यात आले. यासाठी 450 कोटीचा खर्च करण्यात आला आहे. हे देखील नक्की वाचा: Interesting Facts Mars Mangal: मंगळ ग्रहावर किती तासांचा एक दिवस असतो? माहिती आहे का? 

मार्स मिशनचं उद्दिष्ट हे मंगळावर काही सजीवांचा वावर आहे का आणि त्याच्या रहस्यांबाबत शोध लावणं हे होते. यामध्ये मिशन काही प्रमाणात यशस्वी झालं आहे. या मिशन द्वारा मंगळावरील अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.



संबंधित बातम्या

'Mangalyaan' चं इंधन, बॅटरी संपल्याने 8 वर्षांनी संपर्क तुटला - रिपोर्ट्स

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Yeh Sindoor Marathi: नारी शक्तीला सलाम करणारा 'अक्षय कुमार' च्या आवाजातील Mission Mangal चा खास मराठी प्रोमो (Watch Video)

Sunita Williams, Butch Wilmore अवकाशात अडकल्याने प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त होत असताना खात आहेत पिझ्झा; पहा ISS मध्ये त्यांच्या आहारात काय असतं?

SpaceX Successfully Launches ISRO’s GSAT-N2: स्पेसएक्सकडून इस्रोच्या जीसॅट-एन 2 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, भारताची इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढली

Protect Mobile From Explosion: ओवर चार्जिंगमुळे मोबाईल स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ; कसे कराल तुमच्या मोबाईलचे संरक्षण? जाणून घ्या टिप्स

Beaver Moon हा 2024 मधील शेवटचा सूपरमून; पहा आजच्या सूपरमूनचं वैशिष्ट्य काय?