Never Search on These Things on Internet: कोणत्या गोष्टी इंटरनेटवर सर्च करु नयेत? घ्या जाणून
Google, Bing आणि Yahoo सारखी शोध इंजिने ऑनलाइन शोधासाठी सर्वाधिक वापरली जाणारी प्लॅटफॉर्म आहेत. ही शोध इंजिने वापरकर्त्यांना कीवर्ड प्रासंगिकता, वेबसाइट गुणवत्ता, वापरकर्ता अनुभव आणि इतर रँकिंग सिग्नल यासारख्या घटकांवर आधारित सर्वात संबंधित आणि उपयुक्त माहिती प्रदान करण्याचा प्रयत्न करतात. ऑनलाईन सर्च करताना काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.
आजची पिढी आणि इंटरनेट (Internet) यांना वेगळे करुन किंवा पाहून चालणार नाही. त्यामुळे यापुढे डिजिटल युगात वावरताना इंटरनेटला सोबत घेऊनच जगावे लागणार आहे. असे असले तरी कोणतीही गोष्ट चांगली तितकी त्याचे फायदे तोटे आणि पथ्येही आलीच. जी इंटरनेटवर सर्च (Never Search on These Things on Internet) करतानाही लागू होतात. तुम्ही गूगल असो की इतर कोणतेही सर्च इंजिन. ऑनलाईन सर्च करताना काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. अन्यथा तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे इंटरनेटवर सर्च करताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे कळण्यासाठी घ्या जाणून.
लक्षात ठेवा तुम्ही जे काही गूगलवर सर्च करत असता ते सर्व गूगल साठवत असते. या साठवलेल्या माहिताचा दूरुपयोग करणार नाही असे गूगल सांगत असले तरी जर कायदेशीर प्रश्न निर्माण झाला अथवा संंबंधीत देशाची धोरणे बदलली तर गूगलला हा डेटा संबंधित सरकार अथवा अधिकृत यंत्रणांना द्यावा लागतो. त्यामुळे इंटरनेटवर सर्च करताना जरा जपूनच. दुसऱ्या बाजूला वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय आपण कोणत्याही प्रकारची सर्च माहिती साठवत नसल्याचे गूगल सांगते. म्हणूनच, येथे काही विषय आहेत जे एखाद्याने Google किंवा इतर कोणत्याही शोध इंजिनवर शोधणे टाळले पाहिजे. (हेही वाचा, Fraud WhatsApp Number Deactivation: व्हॉट्सअॅपद्वारे फसवणूक करण्यासाठी वापरला जाणारा मोबाईल क्रमांक होणार रद्द- अश्विनी वैष्णव)
तुम्ही इंटरनेटवर कधीही शोधू नये असे विषय :
1. बॉम्ब कसा बनवायचा? प्रेशर कुकर बॉम्ब कसा बनवायचा?
2. बाल पोर्नोग्राफी
3. गुन्हेगारी क्रियाकलाप संबंधित शोध
4. गर्भपाताशी संबंधित गोष्टी/ गर्भपात कसा होतो
ऑनलाइन सर्च म्हणजे इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी शोध इंजिन वापरण्याची प्रक्रिया होय. हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, ज्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणावर माहिती, वेबसाइट्स आणि संसाधने द्रुतपणे ऍक्सेस करता येतात. ऑनलाइन शोध घेत असताना, वापरकर्ते विशेषत: शोध इंजिनच्या शोध बॉक्समध्ये शोधत असलेल्या माहितीशी संबंधित कीवर्ड किंवा वाक्यांश प्रविष्ट करतात. शोध इंजिन नंतर प्रविष्ट केलेल्या क्वेरीचे विश्लेषण करण्यासाठी आणि त्याच्या अनुक्रमणिकेतून संबंधित परिणाम पुनर्प्राप्त करण्यासाठी जटिल अल्गोरिदम वापरते, जो पूर्वी क्रॉल केलेल्या आणि विश्लेषित केलेल्या वेब पृष्ठांचा डेटाबेस आहे.
Google, Bing आणि Yahoo सारखी शोध इंजिने ऑनलाइन शोधासाठी सर्वाधिक वापरली जाणारी प्लॅटफॉर्म आहेत. ही शोध इंजिने वापरकर्त्यांना कीवर्ड प्रासंगिकता, वेबसाइट गुणवत्ता, वापरकर्ता अनुभव आणि इतर रँकिंग सिग्नल यासारख्या घटकांवर आधारित सर्वात संबंधित आणि उपयुक्त माहिती प्रदान करण्याचा प्रयत्न करतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)